Pune Crime | वैकुंठ स्मशानभूमीत चितेजवळ जादूटोणा करणार्या दोघा तृतीयपंथींना अटक; पुण्यात एकच खळबळ
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत चितेजवळ बसून जादूटोणा सारखे अघोरी कृत्य करताना दोन तृतीयपंथीय आढळून आले असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी पहाटे अडीच वाजता हा प्रकार आढळून आला. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)
वैकुंठ स्मशानभूमीमध्ये मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर काही वेळाने शिंदे आणि धुमाळ या चितेजवळ आले. त्यांच्याबरोबर काळ्या रंगाच्या बाहुल्या, काही लोकांचे फोटो, लिंबु, सूया आणि हळदकुंकु असे साहित्य होते. ते तेथे बसून काही कृत्य करीत होते. ही घटना स्मशानभूमीतील एका कर्मचार्याने पाहिले. त्याला संशय आल्याने त्यांनी पोलिसांना फोन करुन ही माहिती दिली. पोलीस तातडीने वैकुंठ स्मशानभूमीत आले. त्यांनी दोघांना रंगेहाथ पकडले. दोघांविरुद्ध नरबळी व इतर अमानुष आघोरी, दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम २०१३ कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली आहे.
Web Title :- Pune Crime | aghori act at midnight in the cemetery 2 transgender caught red handed at pune
हे देखील वाचा :
Filmfare Awards | शिवकालीन युद्ध कलेवर आधारित माहितीपटाला यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त
Amruta Khanvilkar | अभिनेत्री अमृता खानविलकरच्या क्लासिक लुकने इंस्टाग्रामवर लावली ‘आग’
The post Pune Crime | वैकुंठ स्मशानभूमीत चितेजवळ जादूटोणा करणार्या दोघा तृतीयपंथींना अटक; पुण्यात एकच खळबळ appeared first on बहुजननामा.