Header

Rahul Shewale On Aaditya Thackeray | सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात…

Rahul Shewale On Aaditya Thackeray | सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात…

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  Rahul Shewale On Aaditya Thackeray | अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अनेक दिवस हे प्रकरण देशभर गाजत होते. त्याच्या मृत्युला त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला जबाबदार धरत तिच्यावर आरोप करण्यात आले होते. त्याचबरोबर अनेकांची नावे या प्रकरणात रियासोबत घेतली गेली होती. पण तपासाअंती सुशांत सिंग राजपुतने गळफास घेत आत्महत्या केल्याचे तपासात उघड झाले. त्याच प्रकरणात शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांचे देखील नाव घेण्यात आले होते. त्यावर आज पत्रकारांशी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य (Rahul Shewale On Aaditya Thackeray) यांच्या फोनवर रियाने फोन केल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी रिया चक्रवर्तीच्या फोनवरून एयू नावाने सेव्ह असलेल्या क्रमांकावर ४४ कॉल केले गेले होते. एयु म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असं बिहार पोलिसांनी सांगितले आहे. असा गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केला आहे. परंतु त्यांचे हे सर्व आरोप शिवसेना उपनेत्या मनिषा कायंदे यांनी फेटाळून लावले आहेत. तसेच पुरावे असतील तर त्यांनी सादर करावेत असे आव्हान मनीषा कायंदेंनी राहुल शेवाळेंना (Rahul Shewale On Aaditya Thackeray) दिले आहे.

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आधीपासूनच आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले जात होते.
त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

राहुल शेवाळे बोलताना म्हणाले की, ‘एयुचा विषय हा खूप गंभीर आहे.
एयु म्हणजे त्याचा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा होतो. बिहार पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.
याप्रकरणी, सीबीआय, बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांचा तपास वेगवेगळा आहे.
त्यामुळे याची माहिती लोकांना मिळाली पाहिजे.’ असे देखील राहुल शेवाळे म्हणाले. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Rahul Shewale On Aaditya Thackeray | shinde group mp rahul shewale has made serious allegations against yuva sena chief aditya thackeray over actor sushant singh rajput case

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | उद्धव ठाकरेंना 19 बंगल्यांचा हिशोब द्यावाच लागेल – किरीट सोमय्या

Anushka Sharma | अनुष्का शर्माला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण…

Suhana Khan | शाहरूखची मुलगी सुहाना पदार्पनाअगोदरच झाली ट्रोल; चाहते म्हणाले अरे ही तर…

 

The post Rahul Shewale On Aaditya Thackeray | सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात… appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article