Header

Raja Bapat Passed Away | ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे निधन; वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Raja Bapat Passed Away | ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे निधन; वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बहुजननामा ऑनलाईन – Raja Bapat Passed Away | मराठी रंगभूमीसाठी दुखद बातमी आहे. ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लेखक नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या बालनाट्य संस्थेतून बालकराकाराच्या भूमिकेतून त्यांनी रंगभूमीवर पाऊल टाकले होते. त्यांनी आजवर अनेक नाटक सिनेमे आणि मालिकेतून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांनवर पाडली आहे. (Raja Bapat Passed Away)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

‘पप्पा सांगा कुणाचे’, ‘सागर माझा प्राण’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘यशोदा’, ‘श्रीमंत’ आशा गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी करून प्रेक्षकांची मने जिंकली होती. या व्यतिरिक्त त्यांनी दामिनी’, ‘समांतर’, ‘झुंज’, ‘वादळवाट’, ‘या सुखांनो या’ या अशा मराठी मालिकांमध्ये त्यांनी अनेक भूमिका साकारल्या होत्या. एवढेच नाही तर त्यांनी इंग्रजी चित्रपटांमध्ये देखील काम केले होते. ‘बिरबल माय ब्रदर’ या इंग्रजी चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर ‘बाळा गाऊं कशी अंगाई’, ‘एकटी’, ‘जावई विकत घेणे आहे’, ‘प्रीत तुझी माझी’, ‘थोरली जाऊ’, ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले होते.
इंग्रजी आणि मराठी भाषांमधील मालिका चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले होते.
‘वख्त की रफ्तार’, ‘दुश्मन’, ‘खोज’ तर या हिंदी मालिकांमध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारून ते
प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. त्यांच्या जाण्याने रंगभूमीवर शोककळा पसरली आहे.
तर अनेक ठिकाणाहून त्यांना श्रद्धांजली वाहिले जात आहे.

 

Web Title :- Raja Bapat Passed Away |veteran actor raja bapat passed away

 

हे देखील वाचा :

Kasba Constituency By-Election | … तर कसबा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवण्यास तयार- रुपाली ठोंबरे (व्हिडिओ)

MP Sanjay Raut | ‘संतोष बांगर यांच्यात हिंमत असेल तर राऊतांच्या…’, ठाकरे गटाच्या नेत्याचं खुलं आव्हान

NCP Chief Sharad Pawar | खा. गिरीश बापटांनी दिला शरद पवारांना शब्द, म्हणाले – ‘मी आता बरा आहे, लवकरच परत येईन’

 

The post Raja Bapat Passed Away | ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे निधन; वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article