Header

LIC Policy | LIC ची ही योजना काही वर्षांतच बनवते लखपती, मॅच्युरिटीनंतर मिळतील २८ लाख रुपये

LIC Policy | LIC ची ही योजना काही वर्षांतच बनवते लखपती, मॅच्युरिटीनंतर मिळतील २८ लाख रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– LIC Policy | देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) प्रत्येक वर्गातील लोकांसाठी विमा योजना (Insurance Scheme) ऑफर करते. यामध्ये सुरक्षेसोबतच गुंतवणुकीचे पर्यायही उपलब्ध आहेत आणि मॅच्युरिटीनंतर चांगली रक्कम दिली जाते. एलआयसीच्या (LIC Policy) जीवन प्रगती विमा योजनेबाबत (LIC Jeevan Pragti Plan) जाणून घेवूया.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

भारतीय आयुर्विमा महामंडळाची जीवन प्रगती विमा योजना (LIC Jeevan Pragti Bima Yojana) तुम्हाला काही वर्षांत लखपती बनवू शकते. यामध्ये, दररोज २०० रुपये जमा करून, तुम्ही मॅच्युरिटीवर २८ लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करू शकता. जर तुम्ही LIC मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जीवन प्रगती योजना खरेदी करू शकता.

 

किती वर्षात मिळतील २८ लाख
LIC च्या जीवन प्रगती विमा योजनेत गुंतवणूक करून लोकांना लाईफटाइम संरक्षण दिले जाते. तसेच, दररोज २०० रुपये गुंतवल्यास या योजनेअंतर्गत एका महिन्यात ६,००० रुपये जमा होतील. म्हणजे वर्षाला ७२ हजार रुपये जमा होतील. त्यानंतर २० वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला या योजनेत बोनससह २८ लाख रुपये मिळतील. (LIC Policy)

 

पाच वर्षांत वाढते रिस्क कव्हर
या विमा योजनेतील रिस्क कव्हर दर पाच वर्षांनी वाढते. याचा अर्थ दर पाच वर्षांनी विम्याची रक्कम वाढेल.
डेथ बेनिफिटबद्दल बोलायचे झाल्यास, पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर, बोनस आणि विमा रक्कम कुटुंबाला किंवा नॉमिनीला दिली जाते.

 

जीवन प्रगती विमा योजनेचे नियम
LIC च्या जीवन प्रगती विमा योजनेअंतर्गत किमान मुदत १२ आणि २० वर्षे आहे. १२ ते ४५ वर्षे वयोगटातील लोक
ही विमा योजना खरेदी करू शकतात. या योजनेअंतर्गत, प्रीमियमची रक्कम तिमाही,
सहामाही आणि वार्षिक आधारावर जमा करता येते. किमान विमा रक्कम १.५ लाख आणि कमाल मर्यादा नाही.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

विमा संरक्षण कसे मिळेल
जर कोणी या योजनेत २ लाख रुपयांचा विमा घेतला असेल तर पाच वर्षांनी तो २.५ लाख रुपये होईल.
त्यानंतर १० ते १५ वर्षांपर्यंत ही रक्कम तीन लाख रुपये आणि २० वर्षांत ही रक्कम ३.५ लाख रुपये होईल.

 

Web Title :- LIC Policy | lic jeevan pragati plan give rs 28 lakh on maturity just invest of rs 200 per day

 

हे देखील वाचा :

Resham Tipnis | ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Ajit Pawar | ‘अजित पवार नक्कीच मुख्यमंत्री होणार, पण…’ दीपक केसरकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमन दिल्लीच्या AIIMS मध्ये दाखल

 

The post LIC Policy | LIC ची ही योजना काही वर्षांतच बनवते लखपती, मॅच्युरिटीनंतर मिळतील २८ लाख रुपये appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article