Header

Satara Crime | साताऱ्यात पत्नीची पतीविरोधात पोलिसांत धाव; तो तिला विवस्त्र…

Satara Crime | साताऱ्यात पत्नीची पतीविरोधात पोलिसांत धाव; तो तिला विवस्त्र…

सातारा : बहुजननामा ऑनलाईन – साताऱ्यात पतीच आपल्या पत्नीचा लैंगिक छळ (Satara Crime) करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे पत्नीने पतीच्या विरोधात पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. पती कामानिमित्त बाहेरगावी होता. तो रात्रीच्या वेळी पत्नीला फोनवरून विवस्त्र फोटो पाठवण्यास भाग पाडत असे. तसेच हा विकृत पती सतत अनैसर्गिक कृत्ये करून आपल्या पत्नीचा लैंगिक छळ करत होता. त्यामुळे त्रासाला कंटाळून पत्नीने पतीच्या विरोधात पोलिसांत (Satara Crime) धाव घेतली आहे.

 

शाहुपुरी पोलीस ठाण्यात या महिलेने तक्रार दिली आहे. पिडीत विवाहीता 24 वर्षांची असून, ती आपल्या पतीसोबत पुण्यात राहत होती. तिचा पती घराबाहेर गेल्यानंतर अनेकवेळा पत्नीला फोन करायचा आणि तुझे विवस्त्र फोटो पाठव म्हणून जबरदस्ती करायचा. पत्नी भितीपोटी त्याला मोबाईलवर फोटो पाठवत होती. पती विवस्त्र अवस्थेत तिला झोपण्यास भाग पाडत होता. अखेर त्रासाला कंटाळून पत्नीने शाहुपुरी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

विवाहीतेला पतीचा त्रास सुरूच होता. तो तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्ये करत होता.
तिचा एकप्रकारे अनैसर्गिक छळच सुरू होता. तसेच तिचे सासू, सासरे देखील तिला छळत होते.
त्यामुळे या विकृत लोकांना कंटाळून अखेर ती विवाहीता साताऱ्याला निघून गेली.
त्यानंतर तिने शाहुपुरी पोलिसांत या प्रकाराची तक्रार दिली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Web Title :- Satara Crime | satara husband used to tell his wife to send you naked photos at night sataras married woman in the sahupuri police station

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाही आलेली नाही, त्यामुळे सरकार आमच्या…’ – संजय राऊत

Ajit Pawar | साहित्य क्षेत्रात राजकारण्यांनी ढवळाढवळ करू नये; ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम’ पुस्तकावरून अजित पवारांची प्रतिक्रिया

Birendra Saraf | ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ बिरेंद्र सराफ राज्याचे नवीन महाधिवक्ता

Pune PMC News | जाहिरात फलकांचे दर 222 रुपयांवरून 576 रुपये प्रति चौ. फूट होणार; महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव

 

The post Satara Crime | साताऱ्यात पत्नीची पतीविरोधात पोलिसांत धाव; तो तिला विवस्त्र… appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article