Header

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray | संभाजीनगरमधील विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray | संभाजीनगरमधील विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन Shivsena Uddhav Balasaheb Thackeray | संभाजीनगर जिल्ह्यातील तीन तालुक्यातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्री येथे शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला. नव्याने पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना परिवारात स्वागत केले. (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray)

यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, संपर्कप्रमुख डॉ विनोद घोसाळकर उपस्थित होते.

यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैजापूर मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, ऍड प्रतापराव पाटील निंबाळकर, (तालुका अध्यक्ष पंचायत समिती), प्रतापराव पाटील धोर्डे, सभापती, कृ. उ.बा.स.यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पैठणमध्ये भाजपला खिंडार

भाजपचे पैठणचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनाथ भुमरे पाटील, डॉ पांडुरंग राठोड,
जिल्हा उपाध्यक्ष यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज भाजपला धक्का देत शिवबंधन हाती घेतले.

गंगापूर तालुक्यातील माजी सरपंच प्रदीप निरफळ यांच्या सह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत हजारो कार्यकर्त्यांचा संभाजीनगर जिल्ह्यात लवकरच जाहीर पक्षप्रवेश होणार आहे.

आज शिवबंधन हाती घेतलेल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्व गद्दारांना येत्या निवडणुकीत घरी बसवणार असल्याचा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला.

 

Web Title :- Shivsena Uddhav Balasaheb Thackeray | In the presence of shivsena party chief Uddhav Balasheb Thackeray, key office bearers of various parties in Sambhajinagar entered the party

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात गाईसोबत अनैसर्गिक कृत्य, फुरसुंगीमधील संतापजनक प्रकार

NCP-Prachi Pawar | नाशिकमध्ये प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला

Maharashtra IPS Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

 

The post Shivsena Uddhav Balasaheb Thackeray | संभाजीनगरमधील विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article