Header

The Legend of Maula Jatt | अखेर पाकिस्तानी चित्रपट ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’चे भारतातील प्रदर्शन रद्द; अमेय खोपकर यांनी ट्विट करत दिली माहिती

The Legend of Maula Jatt | अखेर पाकिस्तानी चित्रपट ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’चे भारतातील प्रदर्शन रद्द; अमेय खोपकर यांनी ट्विट करत दिली माहिती

बहुजननामा ऑनलाईन – अखेर अभिनेता फवाद खान आणि माहेरा खान यांच्या बहुचर्चित ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ (The Legend of Maula Jatt) भारतात प्रदर्शित होणार नाही. हा चित्रपट 30 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक पावित्र्यानंतर आता या चित्रपटाचे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी स्वतः दोन ट्विट करत दिली आहे. सध्या अमेय खोपकर यांचे ट्विट वायरल होताना दिसत आहे. (The Legend of Maula Jatt)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

द लीजेंड ऑफ मौला जट्ट हा चित्रपट ‘मौला जट्ट’ या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाने आजवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहे. तर आतापर्यंत या चित्रपटाने 200 कोटीहून अधिक व्यवसाय केल्याचे बोलले देखील जात आहे. या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर भारतात देखील हा चित्रपट प्रदर्शित करावा अशी विनंती भारतीय प्रेक्षकांनी केली होती. त्यानंतर 23 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे बोलले गेले. त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शन पुढे ढकलून 30 डिसेंबरला करण्यात आले. मात्र यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत इशारा दिल्यामुळे आता हा चित्रपट महाराष्ट्रात काय भारतात कोठेही प्रदर्शित होणार नाही.

 

अमेय खोपकर यांनी केलेले ट्विट या प्रमाणे
चित्रपट 30 डिसेंबरला प्रदर्शित होणार याची घोषणा केल्यानंतर अमेय खोपकर यांनी ट्विट करत म्हटले की, “पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शनाला पूर्णपणे विरोध आहे. चित्रपट 23 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता त्यानंतर तो 30 डिसेंबरला येतोय मात्र हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही”. असा इशारा त्यांनी दिला होता.

 

 

याचवेळी त्यांनी थेटर मालकांना इशारा देत आणखीन एक ट्विट केले त्यामध्ये ते म्हणाले, “थेटर मालकांना नम्र आवाहन मोठ्या मेहनतीने जी इमारत तुम्ही उभी केली आहे त्याची तोडफोड किंवा त्याचे नुकसान होईल असे काहीही करू नका”. या दोन्ही ट्विट नंतर आता हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार नाही हे ठरले आहे या निर्णयानंतर पुन्हा एकदा अमेय खोपकर यांचे ट्विट चर्चेत आहे.

 

 

यावेळी खोपकर यांनी ट्विट करत म्हणाले, “राज साहेबांचा डंका पाकिस्तानी चित्रपटांचे प्रदर्शन रद्द ….. मनसेने
दिलेल्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानी चित्रपट पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर
संपूर्ण देशभरात कुठेही हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही”. (The Legend of Maula Jatt)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

याचवेळी आणखीन एक ट्विट करत ते म्हणाले,”जर पुन्हा कोणाला पाकिस्तानी कलाकारांबद्दल पुळका आला तर
हा इशारा पुरेसा आहे. मनसे आंदोलनाच्या या विजयानंतर सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन”.
आता सध्या अमेय खोपकर यांचे हे चारही ट्विट सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसत आहेत.

 

 

Web Title :– The Legend of Maula Jatt | the legend of maula jatt pakistani film relesed cancelled after mns raj thackery warning

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘लाड चाललेत नुसते सगळे…’ असे म्हणत अजित पवार भाजपच्या ‘या’ मंत्र्यावर संतापले, सुनावले खडे बोल

Pune Crime News | मला तुझ्यासोबत इथेच शारीरिक संबंध… ! प्रवाशाकडून नग्नावस्थेत रिक्षा चालक महिलेचा पाठलाग, कात्रज घाटातील घटना

Gold-Silver Rate Today | सोनं खेरेदीने नवीन वर्षाचे स्वागत करण्याची सुवर्णसंधी, सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा दर

MP Sanjay Raut | अजित पवारांच्या प्रतिक्रेयेनंतर मविआमध्ये मतभेद असल्याची चर्चा, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले

 

 

 

The post The Legend of Maula Jatt | अखेर पाकिस्तानी चित्रपट ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’चे भारतातील प्रदर्शन रद्द; अमेय खोपकर यांनी ट्विट करत दिली माहिती appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article