Header

Anil Bonde | ‘जयंत पाटलांना शरद पवार हे शकूनी मामा पेक्षाही ‘पॉवरफूल’ आहेत, असे तर म्हणायचे नाही ना’, अनिल बोंडेंचा घणाघात

Anil Bonde | ‘जयंत पाटलांना शरद पवार हे शकूनी मामा पेक्षाही ‘पॉवरफूल’ आहेत, असे तर म्हणायचे नाही ना’, अनिल बोंडेंचा घणाघात

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Anil Bonde | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एका वाहिनीने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलताना, अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी हा शरद पवार (Sharad Pawar) यांची राजकीय खेळी असू शकते. असे वक्तव्य केले होते. त्यावरून वेगवगळ्या प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून समोर येत आहेत. यावरून सत्ताधारी विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेताना दिसत आहेत. त्यातच भाजपचे खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

अनिल बोंडे म्हणाले, ‘शरद पवार जर एवढ्या खेळी करत असतील, तर त्यांच्या प्रकृतीवर नक्कीच परिणाम होत असेल. ते एवढी कटकारस्थानं करत असतील, तर ती सामान्य माणसाला न पटणारी असतात. महाभारतात शकुनीने एवढी कट-कारस्थानं केली. जर एवढी कट-कारस्थानं होत असतील, तर ते शकुनीपेक्षा काही कमी आहेत असं म्हणता येणार नाही. मग जयंत पाटलांना असं म्हणायचं आहे का की शरद पवार शकुनीपेक्षा कट-कारस्थानांमध्ये पॉवरफुल आहेत?’ असं म्हणतं अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

 

दरम्यान, यावेळी बोलताना अनिल बोंडे यांनी शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray Group) आणि
वंचित बहुजन आघाडी (VBA) यांच्यामध्ये झालेल्या युतीवर देखील भाष्य केले. अनिल बोंडे म्हणाले की,
‘उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिसतंय की शिवसेना बुडतेय. बुडत्याला काठीचा आधार असतो.
त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा (Prakash Ambedkar) वापर उद्धव ठाकरे काठीसारखा करत आहेत.
बुडत्या शिवसेनेला किमान वंचित वाचवू शकेल असं त्यांना वाटतंय. बुडत्याचे पाय खोलात असंही म्हणतात.
उद्धव ठाकरेंचे पाय जास्त खोलात आहेत कारण विचार वेगवेगळे आहेत.
प्रकाश आंबेडकर स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने आहेत. शिवसेना संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूची आहे.
शिवसेनेचा प्रखर हिंदुत्ववाद शिवसेनेचा होता, जो प्रकाश आंबेडकरांना कधीच रुचला नाही.
उद्धव ठाकरे राष्ट्रवादीच्या गळ्यातले ताईत आहेत. पण राष्ट्रवादीशी प्रकाश आंबेडकरांचं विळ्या-भोपळ्याचं
सख्य आहे. त्यामुळे शिवसेनेचे पाय खोलात चालले आहेत.’
अशी टीका त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीवर केली आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Anil Bonde | bjp mp anil bonde mocks sharad pawar on jayant patil statement ajit pawar oath

 

हे देखील वाचा :

Chandrashekhar Bawankule | प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे, चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र

Rohit Pawar | रोहित पवार यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सल्ला; म्हणाले…

Mohsin Shaikh Murder Case | संपूर्ण देशात गाजलेल्या पुण्यातील मोहसीन शेख हत्या प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, हिंदु राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईसह सर्वांची निर्दोष मुक्तता

 

The post Anil Bonde | ‘जयंत पाटलांना शरद पवार हे शकूनी मामा पेक्षाही ‘पॉवरफूल’ आहेत, असे तर म्हणायचे नाही ना’, अनिल बोंडेंचा घणाघात appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article