Amol Mitkari | संत तुकाराम महाराजांवर केलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या ‘त्या’ विधानावर अमोल मिटकरी आक्रमक; म्हणाले…
अकोला : बहुजननामा ऑनलाईन – Amol Mitkari | गेल्या काही दिवसांपासून धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) अर्थात बागेश्वर महाराज हे चांगलेच चर्चेत आहेत. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. त्यात त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यावरून महाराष्ट्रातील राजकीय नेते तसेच संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अमोल मिटकरी यांनी यावर भाष्य केले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यावेळी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, ‘राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर बुवा-बाबांचे पीक फोफावले आहे. पळपूटा आणि अक्कलशून्य असलेला बागेश्वरबाबा, त्याला शाम मानव (Shyam Manav) यांनी ४० लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. तोच बागेश्वर आज संत तुकाराम महाराज यांच्या पत्नीवर बोलतो. आईसाहेब उर्फ जिजाबाई स्वतः भंडारा डोंगरावर त्यांच्या पतीची सेवा करत होत्या. तुकोबांचा प्रचंड अभिमान असणाऱ्या आईसाहेबांबद्दल ज्या पातळीवर जाऊन त्याने विधान केले आहे. मला वाटतं की वारकरी संप्रदाय काय आहे, हे या वेड्याला माहित नाही.’ अशी टीका यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी बागेश्वर बाबावर केली आहे.
तसेच यावर पुढे बोलताना अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी संत तुकराम महाराज यांच्या अभंगाचा संदर्भ देत बागेश्वर महाराजांवर हल्लाबोल केला. अमोल मिटकरी म्हणाले, ‘धीरेंद्र शास्त्री सारखी कोल्हेकुई जेव्हा सुरू असते, त्यावर तुकोबांनी सांगितलं आहे. “अवघे कोलियाचे वर्म अंडी घातलिया, तोंडी खीळ पडे।” अशा बदमाशांच्या नाजूक भागावर हल्ला केला तर यांचं थोबाड बंद होतं.
त्यामुळे वारकरी सांप्रदायाला आणि त्याचा अधिष्ठानाला जर असा पापी आणि बेअक्कल असलेला महाराज काही बोलत असेल,
तर मला असं वाटतं की वारकरी सांप्रदायाने याची गंभीर दखल घ्यावी.
हा जिथे दिसेल, तिथे याला ठोकून काढा.’
अशी गंभीर भूमिका देखील यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी घेतली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Amol Mitkari | amol mitkari reaction on bageswar dham dhirendra krushna maharaj controversial statement on sant tukaram maharaj
हे देखील वाचा :
Pune Metro | चंद्रकांतदादा, क्या हुआ तुम्हारा वादा ?
Prisoners Release | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 189 बंद्यांची सुटका
The post Amol Mitkari | संत तुकाराम महाराजांवर केलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या ‘त्या’ विधानावर अमोल मिटकरी आक्रमक; म्हणाले… appeared first on बहुजननामा.