Gauahar Khan | बेबी बम्प फ्लॉन्ट करत बिग बॉस फेम गौहर खानने केले हटके फोटोशूट
बहुजननामा ऑनलाईन – बिग बॉस फेम अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) आज सगळ्यांच्याच लक्षात आहे. बिग बॉसमध्ये तिने चांगल्या खेळीने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले होते. यानंतर बिग बॉसच्या प्रत्येक सीझनमध्ये नक्की काय घडत आहे आणि कोण स्पर्धा विनर असू शकेल अशा अनेक गोष्टींवर तिने ट्विट करून स्वतःचे मत मांडले आहे. याचबरोबर गौहर खान (Gauahar Khan) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते. नुकताच गौहर खानने नवीन फोटोशूट केला असून तिचे हे फोटोज चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गौहर खानने काही काळापूर्वीच सोशल मीडियावर स्टार असणाऱ्या जैद दरबार सोबत लग्न करत चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. त्यानंतर आता ती लवकरच आई बनणार असल्याची गोड बातमी इंस्टाग्राम वर शेअर केली होती. तर आता गौहरने आपल्या नव्या फोटोशूट मध्ये बेबी बम्प फ्लॉन्ट करत सुंदर असे पोजेस दिले आहेत. तिच्या या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसून येत आहे. तर तिचे हे फोटोज चाहत्यांना देखील खूपच भावल्याचे दिसत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बिग बॉसच्या घरात गौहर खान (Gauahar Khan) आणि कुशल टंडन यांचे प्रेम प्रकरण चांगलेच रंगले होते.
मात्र घराच्या बाहेर पडताच त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येऊ लागल्या.
त्यांच्या या निर्णयाने चाहते मात्र दुखावले होते. त्यानंतर कालांतराने गौहर खानने जैद दरबार सोबत संसार
थाटला आणि आता त्यांची केमिस्ट्री देखील लोकांना प्रचंड आवडत आहे.
गौहरने नुकताच शेअर केलेले फोटोज इंस्टाग्राम वर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
तर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Web Title :- Gauahar Khan | gauahar khan flaunt her baby bump see actresses
हे देखील वाचा :
MLA Laxman Jagtap Passed Away | भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
The post Gauahar Khan | बेबी बम्प फ्लॉन्ट करत बिग बॉस फेम गौहर खानने केले हटके फोटोशूट appeared first on बहुजननामा.