MLA Laxman Jagtap Passed Away | भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – MLA Laxman Jagtap Passed Away | चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. पुण्यातील एका खासगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते एका दुर्धर आजाराने त्रस्त होते. अखेर आज सकाळी ( दि. ३ जानेवारी) रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. (MLA Laxman Jagtap Passed Away)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे बोलले जात होते. पण दिवाळीनंतर त्यांना परत प्रकृतीच्या कारणास्तव रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली त्यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. आपल्या भागातील अतिशय लोकप्रिय नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे जगताप कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/9YxhkbI66u
— Supriya Sule (@supriya_sule) January 3, 2023
काही दिवसांपूर्वीचं फडणवीसांनी मानले होते आभार –
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी आजारी असताना देखील पक्षातर्फे मतदानाचा हक्क बजावला होता त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही आमदारांचे आभार मानले होते. नुकतचं काही दिवसापूर्वी कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले होते आणि आज भाजपचे पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून विविध राजकीय नेत्यांकडून लक्ष्मण जगताप यांना श्रध्दांजली वाहण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रध्दांजली वाहिली.
सुप्रिया सुळे आपल्या ट्वीटमध्ये लिहतात, ‘चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे
आज निधन झाले. आपल्या भागातील अतिशय लोकप्रिय नेतृत्व अशी त्यांची ओळख होती.
त्यांच्या निधनामुळे जगताप कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
भावपूर्ण श्रध्दांजली.’ असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आमदार लक्ष्मण जगताप यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी दु. 3 ते 6 या वेळेत पार्थिव त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे.
संध्या 7 वाजता अंत्यविधी पिंपळे गुरव येथे होईल.
Web Title :- MLA Laxman Jagtap Passed Away | bjp mla laxman jagtap passed away pimpri chinchwad Pune Sad News
हे देखील वाचा :
Pune Crime | नववर्षाच्या सुरुवातीला कोथरुड, सिंहगड रस्ता परिसरात घरफोड्या, 64 लाखांचा ऐवज लंपास
The post MLA Laxman Jagtap Passed Away | भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन appeared first on बहुजननामा.