Header

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; इऑन वॉरीयर्स संघाचा सलग चौथा विजय; एसके डॉमिनेटर्स संघानी गुणांचे खाते उघडले !!

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; इऑन वॉरीयर्स संघाचा सलग चौथा विजय; एसके डॉमिनेटर्स संघानी गुणांचे खाते उघडले !!

पुणे : बहुजननामा ऑनलाईन पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ (Indrani Balan Winter T-20 League) अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत इऑन वॉरीयर्स संघाने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून स्पर्धेत विजयी चौकार मारला. एसके डॉमिनेटर्स संघाने स्पर्धेत पहिला विजय मिळवत गुणांचे खाते उघडले. (Indrani Balan Winter T-20 League)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत आलम शेख याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर इऑन वॉरीयर्स संघाने ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा ९ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव ११८ धावांवर गुंडाळला गेला. नीरज शर्मा (२४ धावा) आणि प्रशांत मीना (२० धावा) यांनी संघाचा डाव सावरला. आलम शेख (२-१३) आणि रेहान खान (२-२१) यांनी अचूक गोलंदाजी केली. हे आव्हान इऑन वॉरीयर्सने १०.४ षटकात व १ गडी गमावून पूर्ण केला. अभिमन्युसिंग चौहान याने नाबाद ५९ धावांची आणि आलम शेख याने नाबाद ३७ धावांची खेळी करून संघाचा विजय सोपा केला.

 

 

सुहेल श्रीखंडे याच्या ६६ धावांच्या जोरावर एसके डॉमिनेटर्स संघाने पुना क्लब संघाचा ६३ धावांनी पराभव करून पहिला विजय नोंदविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना सुहेल श्रीखंडे याच्या ६६ धावा आणि साहील औताडे याच्या ३५ धावांच्या जोरावर एसके डॉमिनेटर्स संघाने १७७ धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानासमोर पुना क्लब संघाचा डाव ११४ धावांवर संपुष्टात आला. अखिलेश गवाळे (३७ धावा) आणि अजिंक्य नाईक (२८ धावा) यांनी पुना क्लब संघाकडून प्रतिकार केला. अजय बोरूडे (४-२५), ओंकार तागडे (२-२०) आणि हितेन बनसोडे (२-२१) यांनी अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय साकार केला. (Indrani Balan Winter T-20 League)

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात १० गडी बाद ११८ धावा (नीरज शर्मा २४, प्रशांत मीना २०, आलम शेख २-१३, रेहान खान २-२१) पराभूत वि. इऑन वॉरीयर्सः १०.४ षटकात १ गडी बाद ११९ धावा (अभिमन्युसिंग चौहान नाबाद ५९ (३६, ८ चौकार, २ षटकार), आलम शेख नाबाद ३७); सामनावीरः आलम शेख;

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

एसके डॉमिनेटर्सः २० षटकात ९ गडी बाद १७७ धावा (सुहेल श्रीखंडे ६६ (३४, ३ चौकार, ७ षटकार),
साहील औताडे ३५, शुभम कोठारी २-२७, ओंकार अखाडे २-४०)
वि.वि. पुना क्लबः १६.५ षटकात १० गडी बाद ११४ धावा (अखिलेश गवाळे ३७, अजिंक्य नाईक २८,
अजय बोरूडे ४-२५, ओंकार तागडे २-२०, हितेन बनसोडे २-२१); सामनावीरः सुहेल श्रीखंडे;

 

Web Title :- Indrani Balan Winter T-20 League | 2nd ‘Indrani Balan Winter T20 League’
Championship Cricket Tournament; Aeon Warriors’ fourth win in a row; SK Dominators Team Opened Points Account !!

 

हे देखील वाचा :

Chitra Wagh | ‘मला पंतप्रधान नरेंद्र मोदींची काळजी वाटते…’ सुप्रिया सुळेच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या- ‘अहो सुप्रिया सुळे ताई तुम्ही…’

MLA Rohit Pawar | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर आमदार रोहित पवार यांची बोचरी टीका; म्हणाले…

Marathwada Teacher Constituency | मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांना मोठा धक्का; विश्वासू सहकारी भाजपच्या गोटात

 

The post Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; इऑन वॉरीयर्स संघाचा सलग चौथा विजय; एसके डॉमिनेटर्स संघानी गुणांचे खाते उघडले !! appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article