Pune Police News | पुणे पोलिस दलास नेमबाजीत विजेतेपद ! सीपी रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त डॉ. जालींदर सुपेकरांनी केले स्पर्धकांचे अभिनंदन
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Police News | महाराष्ट्र राज्य पोलिस क्रिडा स्पर्धेत (Maharashtra State Police Sports Competition) पुणे पोलिस दलास नेमबाजीमध्ये Shooting (Sports) विजेतेपद मिळाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते शुटींग पुरूष, शुटींग महिला आणि शुटींग सर्व्हिस वेपन या तिन्ही प्रकारामध्ये विजेते पदाचे कप प्रधान करण्यात आले. ही स्पर्धा दि. 7 ते 13 जानेवारी 2023 दरम्यान पार पडली. पदक विजेत्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांचे पोलिस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह आयुक्त संदीप कर्णिक (Jt Sandeep Karnik) आणि अपर आयुक्त डॉ. जालींदर सुपेकर (Addl CP Dr. Jalindar Supekar) यांनी अभिनंदन केले आहे. (Pune Police News )
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
स्पर्धेतील पदक विजेत्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. (Pune Police News)
1. पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण – पिस्टल – कास्य पदक
2. सहाय्यक निरीक्षक राकेश कदम – पिस्टल – एक सुवर्ण व दोन रौप्य पदक
3. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे – रायफल – कास्य पदक
4. पोलिस अंमलदार राजेंद्र पाटील – पिस्टल – 5 सुवर्ण, एक कास्य, रायफल – 2 सुवर्ण, पिस्टल व एमपी 5 – बेस्ट शुटर ट्रॉफी
5. पोलिस अंमलदार अमोल नेवसे – रायफल – सुवर्ण
6. पोलिस अंमलदार महेश जाधव, रायफल – एक सुवर्ण, एक रौप्य, एक कास्य
7. पोलिस अंमलदार अनिल उकरे – रायफल – एक कास्य
8. पोलिस अंमलदार मंगेश खेडकर – रायफल – एक कास्य पदक
9. पोलिस अंमलदार दत्तात्रय खाडे – पिस्टल – एक सुवर्ण, एक रौप्य
10. पोलिस अंमलदार यास्मीन सय्यद – पिस्टल – एक कास्य
11. पोलिस अंमलदार वैशाली गोडगे – पिस्टल – तीन रौप्य
सर्व नेमबाज स्पर्धकांनी आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडून नेमबाजीचा सराव करून हे यश संपादित केले आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त डॉ. जालींदर सुपेकर, मुख्यालयाचे उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गर्शनाखाली पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण (PI Ankush Chintaman), राखीव पो.नि. किशोर टुेंभुर्णे व राखीव उपनिरीक्षक हटकर यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेकांनी पदके मिळवली आहेत. अति वरिष्ठ अधिकार्यांनी सर्वच पदक प्राप्त नेमबाज स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Police News | Pune Police force won the title in shooting ! CP Retesh Kumaarr, Joint Commissioner Sandeep Karnik, Additional Commissioner Dr. Jalinder Supekar congratulated the contestants
हे देखील वाचा :
Pune Crime News | पोलीस नियंत्रण कक्षाला फोन अन् चोरटे जेरबंद; हडपसरमध्ये घरफोडी करणारा अटकेत
The post Pune Police News | पुणे पोलिस दलास नेमबाजीत विजेतेपद ! सीपी रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त डॉ. जालींदर सुपेकरांनी केले स्पर्धकांचे अभिनंदन appeared first on बहुजननामा.