Header

Maharashtra Cabinet Expansion | ‘मंत्रिमंडळ विस्तार करण्याचं धाडस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये नाही’ – काँग्रेस

Maharashtra Cabinet Expansion | ‘मंत्रिमंडळ विस्तार करण्याचं धाडस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये नाही’ – काँग्रेस

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  Maharashtra Cabinet Expansion | राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर 40 दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. यावरून विरोधकांनी टीका केली होती. अशात आता आणखी 23 पदांचा विस्तार होणे बाकी आहे. मात्र या विस्ताराला सरकारला मुहूर्त सापडत नसल्याने विरोधकांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) आधी विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) केला जाईल अशी चर्चा होती. परंतु तसे झाले नाही. यावरुन काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

नवी मुंबई येथे दोन दिवसीय शिबीर झाले. या शिबीरात उपस्थित राहून पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर (Maharashtra Cabinet Expansion) भाष्य करताना शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) टीकास्त्र सोडलं.

 

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

शिंदे फडणवीस सरकारमध्ये 43 जणांच्या मंत्रिमंडळात फक्त 20 मंत्री आहेत. उर्वरित 23 मंत्रिपदं भरण्याची हिंमत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाही. कारण हे सरकार ज्या पद्धतीने राज्यात आलं त्यामुळे जनतेत एक प्रकारची नाराजी आहे. त्यामुळे रस्त्यावर गेल्यावर या सरकारला काय होतंय ते लक्षात येईल. विविध निवडणुकाही याच कारणांमुळे पुढे ढकलल्या जात असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

भाजपकडून तिरस्कार पसरवण्याचा प्रयत्न

भाजपकडून (BJP) तिरस्कार पसरवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे.
त्याला कसं तोंड द्यायचं यासाठी आम्ही आमच्या परिने प्रयत्न करत आहोत.
दोन दिवसांच्या शिबीरात आम्ही हीच बाब अधोरेखित केली होती.
आरएसएस असो किंवा भाजप त्यांच्या लोकांकडून लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार केले जात आहे.
परंतु याच्या विरोधात आम्ही एकत्र असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

 

Web Title :- Maharashtra Cabinet Expansion | the chief minister and deputy chief minister do not have the courage to expand the cabinet says congress leader prithviraj chavan

 

हे देखील वाचा :

Rashi Khanna | अभिनेत्री राशी खन्नाच्या निखळ सौंदर्याने चाहते थक्क; फोटोवर कौतुकांचा वर्षाव

Urvashi Rautela | नॅशनल टीव्हीवर अनिल कपूर यांनी उर्वशी रौतेलाची केली होती बेइज्जती; काय आहे ‘ते’ प्रकरण?

Myra Vaikul | मोठमोठ्या कलाकारांना देखील लाजवेल असे पोजेस ‘या’ बालकलाकाराने दिले; मकर संक्रांत निमित्त शेअर केले स्पेशल फोटो

 

The post Maharashtra Cabinet Expansion | ‘मंत्रिमंडळ विस्तार करण्याचं धाडस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये नाही’ – काँग्रेस appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article