Header

Nagpur Crime | खासदार क्रीडा महोत्सवात भाजप नेत्याच्या मुलाने घातला राडा; पंच, आयोजकांना केली मारहाण (व्हिडिओ)

Nagpur Crime | खासदार क्रीडा महोत्सवात भाजप नेत्याच्या मुलाने घातला राडा; पंच, आयोजकांना केली मारहाण (व्हिडिओ)

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – Nagpur Crime | नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागपूरमध्ये सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून खासदार क्रीडा महोत्सव (MP Sports Festival) सुरू आहे. या महोत्सवात एका सामन्यादरम्यान भाजप नेते मुन्ना यादव (BJP leader Munna Yadav) यांच्या मुलाने पंच आणि आयोजकांना बेदम मारहाण (Beating) केली आहे. या सगळ्या प्रकारामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. मुन्ना यादव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. (Nagpur Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय आहे नेमके प्रकरण ?
खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत छत्रपती चौकात खामला एलेव्हण आणि स्टार इलेव्हण या दोन संघामध्ये क्रिकेटचा सामना सुरु होता. यातील एका संघामध्ये मुन्ना यादव यांची मुले अर्जुन आणि करन यांचाही समावेश होता. यादरम्यान अर्जुनने थ्रो बॉल वर पंचांशी वाद घातला. त्यावेळी पंचानी त्याला समजावून सांगितले मात्र तो निर्णय मागे घेण्यावर अर्जुन आडून बसला. यानंतर त्याने मैदानावर गोंधळ घालायला सुरुवात केली. (Nagpur Crime)

 

 

मात्र तरीही पंचांनी हा निर्णय मागे घेण्यास नकार दिल्यानं त्यानं मैदानात गोंधळ घालत पंचांना मारहाण केली. यानंतर मुन्ना यादव यांच्या समर्थकांनी मैदानात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे अखेर शेवटी हा आयोजकांना हा सामना बंद करावा लागला. या सगळ्या प्रकारची तक्रार आयोजक संदीप जोशी यांच्याकडे करण्यात आली मात्र दोन दिवस उलटूनही आयोजकांनी यावर काही कारवाई न केल्याने अखेर पीडित व्यक्तीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Nagpur Crime | bjp leaders son beat up umpire in nagpur

 

हे देखील वाचा :

Sandeep Deshpande | मुंबईत कोरोनाकाळात मोठा घोटाळा; मनसे नेते संदिप देशपांडे यांचा खळबळजनक दावा, २३ जानेवारीला सादर करणार पुरावे

Pune Crime News | फेसबुक फ्रेंडने अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करुन केला अत्याचार; अल्पवयीन असल्यापासून सुरु होता प्रकार

 

The post Nagpur Crime | खासदार क्रीडा महोत्सवात भाजप नेत्याच्या मुलाने घातला राडा; पंच, आयोजकांना केली मारहाण (व्हिडिओ) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article