Header

Sandeep Deshpande | मुंबईत कोरोनाकाळात मोठा घोटाळा; मनसे नेते संदिप देशपांडे यांचा खळबळजनक दावा, २३ जानेवारीला सादर करणार पुरावे

Sandeep Deshpande | मुंबईत कोरोनाकाळात मोठा घोटाळा; मनसे नेते संदिप देशपांडे यांचा खळबळजनक दावा, २३ जानेवारीला सादर करणार पुरावे

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन मुंबई महापालिकेची निवडणुक (Mumbai Municipal Corporation Election) कोणत्याही क्षणी लागू शकते. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यातील सगळेच पक्ष या निवडणुकीत विजय संपादित करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच मनसे नेते संदिप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ठाकरे गटाची सत्ता मुंबई महापालिकेत असताना कोविडकाळात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे आरोप ठाकरे गटावर केले आहेत. तसेच हा घोटाळा २३ जानेवारीला सर्वांसमोर आणणार असे देखील ते (Sandeep Deshpande) म्हणाले आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

नुकतचं, एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना संदिप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले की, ‘एक व्यक्ती माझ्या शाखेत आली. त्या व्यक्तीने काही कागदपत्रे आणि पेन ड्राइव्ह शाखेत दिले. त्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. मात्र, मी तो पेन ड्राइव्ह पाहिला, कागदपत्रे पाहिली. विरप्पन गँगने कोरोना काळात मुंबईची लूट केली. या लुटीचे ढळढळीत पुरावे या पेन ड्राइव्हमध्ये आहेत. सोमवारी २३ जानेवारी रोजी आम्ही हे सगळं माध्यमांसमोर मांडणार आहोत. तसेच पोलिसांत तक्रार देखील देणार आहोत.’ असे त्यांनी या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

 

 

त्याअगोदर भाजपकडून (BJP) देखील ठाकरे गटावर (Shivsena Thackeray Faction) या
घोटाळ्यासंबंधी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजप नेते खासदार किरीट सोमय्या (MP Kirit somaiya) यांनी कोरोना काळात मुंबई महापालिकेत मोठे घोटाळे झाल्याचे म्हटले आहे. किरीट सोमय्या यांच्याकडून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. तसेच त्यांनी यात संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या निकटवर्तीयाला पालिकेचे कंत्राट दिले गेल्याचे आरोप केले आहेत. असं असतानाच आता संदिप देशपांडे हे कुठले पुरावे नक्की सादर करणार आहेत. आणि त्या पुराव्यांमध्ये नक्की काय असणार आहे, हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Sandeep Deshpande | mns leader sandeep deshpande corruption allegations on uddhav thackeray reveals on 23 january

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | फेसबुक फ्रेंडने अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करुन केला अत्याचार; अल्पवयीन असल्यापासून सुरु होता प्रकार

Beed News | व्हॉट्सअॅवर ‘आय एम सॉरी’ स्टेटस ठेवून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याने उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime News | पैसे देत नसल्याने मित्रांनीच केले अपहरण; चौघांना अटक, खंडणीचा गुन्हा दाखल

 

The post Sandeep Deshpande | मुंबईत कोरोनाकाळात मोठा घोटाळा; मनसे नेते संदिप देशपांडे यांचा खळबळजनक दावा, २३ जानेवारीला सादर करणार पुरावे appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article