Header

Pune Crime News | 1 कोटींची ट्रान्झेक्शन केल्यास बेनिफिट मिळवून देण्याच्या नावाखाली व्यावसायिकांची फसवणूक

Pune Crime News | 1 कोटींची ट्रान्झेक्शन केल्यास बेनिफिट मिळवून देण्याच्या नावाखाली व्यावसायिकांची फसवणूक

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | सध्या सर्वत्र ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे उलाढाल वाढली आहे. त्याचा गैरफायदा घेऊन एकाने व्यावसायिकांना तुम्ही महिन्याभरात एक कोटींची ट्रान्झेक्शन केल्यास त्यावर एक तोळे सोने देण्याचे आमिष दाखवून त्यांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी बिबवेवाडी येथील एका २८ वर्षाच्या व्यावसायिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चेतन अनिल गादेकर Chetan Anil Gadekar (वय २७, रा. टिळेकरनगर, कोंढवा Tilekar Nagar, Kondhwa) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २१ जून २०२२ पासून आतापर्यंत घडला आहे. आरोपीने अनेक जणांना गंडा घातला असून आतापर्यंत चार जणांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा अप्पर इंदिरानगर येथे व्यवसाय आहे.
आरोपी चेतन याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.
भारत पे च्या मशीनवरुन महिन्याला १ कोटी रुपयांचे ट्रान्झेक्शन केल्यास त्यातून फायदा मिळेल. त्यामधून फिर्यादी यांना एक तोळे सोने देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून या स्कीमसाठी ९ लाख ९ हजार ७६५ रुपये घेतले. अशाच प्रकारे त्याने या परिसरातील आणखी ३ जणांना स्कीमचे आमिष दाखवून त्यांच्याकडून काही लाख रुपये लाटले. परंतु, त्यांना कोणताही फायदा न देता त्यांची फसवणूक केली आहे. चेतन याने आणखी काही जणांची फसवणूक केली असल्याची शक्यता असून सहायक पोलीस निरीक्षक बरडे तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Pune Crime News | Fraud of businessmen in the name of getting benefit on transaction of 1 crore

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुण्यात कोयते उगारून दहशत निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाई – पोलिस आयुक्त रितेश कुमार (Video)

Rajasthani Pravasi Samaj | पुणे ते जोधपूर रेल्वेसेवा दररोज सुरु करा ! अखिल राजस्थानी समाज संघाचे रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन

Maharashtra State Police Sports Competition On Pune | पुण्यात महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचा शनिवारपासून प्रारंभ, 13 संघांचा समावेश

 

The post Pune Crime News | 1 कोटींची ट्रान्झेक्शन केल्यास बेनिफिट मिळवून देण्याच्या नावाखाली व्यावसायिकांची फसवणूक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article