Header

Sania Mirza Retirement | सानिया मिर्झा टेनिसमधून घेणार निवृत्ती; ‘या’ ठिकाणी खेळणार शेवटचा सामना

Sania Mirza Retirement | सानिया मिर्झा टेनिसमधून घेणार निवृत्ती; ‘या’ ठिकाणी खेळणार शेवटचा सामना

बहुजननामा ऑनलाईन – Sania Mirza Retirement | सानिया मिर्झाच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. सानिया मिर्झा लवकरच टेनिसमधून निवृत्ती घेणार आहे. सानिया मिर्झाने याची घोषणा केली आहे. सानियाला झालेल्या इंज्युरीमुळे तिने हा निर्णय घेतला आहे. हैदराबाद येथील सानियानं, महेश भूपती आणि लिएंडर पेस या पुरुष सहकाऱ्यांसह भारतीय टेनिसला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

फेब्रुवारी (2023) महिन्यामध्ये दुबईत होणारी डब्ल्यूटीए 1000 स्पर्धा ही तिची शेवटची टेनिस स्पर्धा असणार आहे. मिश्र आणि महिला दुहेरीत सहा वेळा ग्रँडस्लॅम विजेती सानिया या महिन्याच्या (जानेवारी) शेवटी ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार आहे. ही तिची शेवटची मोठी स्पर्धा असेल. यानंतर ती दुबईत होणाऱ्या डब्ल्यूटीए 1000 स्पर्धेनंतर निवृत्त होणार आहे. सानिया मिर्झा 2022 या वर्षाच्या अखेरीस निवृत्ती घेणार होती. कोपऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे तिने काही काळ निवृत्ती पुढे ढकलली. (Sania Mirza Retirement)

 

सानिया मिर्झाने निवृत्तीनंतर दुबईमध्ये असलेल्या तिच्या टेनिस अकादमीवर लक्ष केंद्रित करणार आहे.
सानियाने आपल्या कारकिर्दीत महिला दुहेरीत तीन आणि मिश्र दुहेरीत तीन ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.
तसेच 2016 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिने सेमी फायनलमध्ये धडक मारली होती.

 

 

Web Title :- Sania Mirza Retirement | sania mirza will retire from professional tennis after dubai wta 1000 event

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | शिवाजीनगर गावठाणात टोळक्यांचा धुडगुस; पूर्ववैमनस्यातून वाहनांची केली तोडफोड

Pune Crime News | घरात शिरुन तरुणीवर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी; बोपोडीतील घटना

 

The post Sania Mirza Retirement | सानिया मिर्झा टेनिसमधून घेणार निवृत्ती; ‘या’ ठिकाणी खेळणार शेवटचा सामना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article