Header

Pune Crime News | तब्बल 3 महिन्यांनी खूनाचा गुन्हा दाखल; भारती विद्यापीठ पोलिसांनी केली तिघांना अटक

Pune Crime News | तब्बल 3 महिन्यांनी खूनाचा गुन्हा दाखल; भारती विद्यापीठ पोलिसांनी केली तिघांना अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | जांभुळवाडी (Jambulwadi, Pune) दरीपुलाखाली सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाबाबत तब्बल तीन महिन्यांनंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा (FIR) दाखल केला असून तिघा जणांना संशयावरुन अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

आदेश सुभाष मगरे (वय २३), योगेश गोकुळ सपकाळे (वय २८) आणि विशाल विष्णु कांबळे (वय २५, सर्व रा. आंबेगाव पठार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

किरण रोहिदास शेंडकर (वय २४, रा. दत्तनगर, निंबाळकरवस्ती, गुजरवाडी फाटा, कात्रज) असे खून (Murder In Pune) झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

याबाबत त्यांचे वडिल रोहिदास चंद्रकांत शेंडकर (वय ५०) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६१/२३) दिली आहे. ही घटना जांभुळवाडी दरी पुलाखाली १० ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ७ ते रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली होती. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा किरण शेंडकर याचा मृतदेह जांभुळवाडी दरी पुलाखाली सापडला होता. पोलिसांना प्रथमदर्शनी मारहाणीच्या कोणत्याही खुणा अंगावर दिसल्या नाहीत.
डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला होता. पोलिासंनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली होती.
किरण शेंडकर याने पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केली असावी, अशीही शंका पोलिसांनी व्यक्त केली होती.
किरण हा या तीन आरोपींबरोबर पार्टी करण्यास गेला होता.
त्यांनीच किरणला मारले असल्याचा संशय फिर्यादी यांनी व्यक्त केला होता.
परंतु, पोलिसांनी त्याला दाद न दिल्याने शेवटी त्यांनी पोलीस आयुक्तांपासून पालकमंत्र्याकडे अर्ज केले.
त्यानंतर आता ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मारहाणीमुळे मृत्यु झाला असल्याची शक्यता असल्याचा अभिप्राय दिल्यानंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक कर्चे अधिक तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Pune Crime News | Case of murder registered after almost 3 months; Bharti University police arrested three

 

हे देखील वाचा :

Pune Police Combing Operation | प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांची झाडाझडती; 27 कोयते जप्त, 37 जणांना अटक

Pune PMC News | महापालिकेचा विद्युत विभाग सी.एस.आर.च्या नावाखाली ठेकेदारांच्या मानगुटीवर खर्च लादतो

Pune Pimpri Crime News | महापालिकेत अतिक्रमणाची तक्रार केल्याच्या रागातून बेदम मारहाण, दापोडीतील घटना

 

The post Pune Crime News | तब्बल 3 महिन्यांनी खूनाचा गुन्हा दाखल; भारती विद्यापीठ पोलिसांनी केली तिघांना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article