Header

Pune Crime News | पैसे देत नसल्याने मित्रांनीच केले अपहरण; चौघांना अटक, खंडणीचा गुन्हा दाखल

Pune Crime News | पैसे देत नसल्याने मित्रांनीच केले अपहरण; चौघांना अटक, खंडणीचा गुन्हा दाखल

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | घेतलेले पैसे परत देत नसल्याच्या कारणावरुन मारहाण करुन पळवून नेणार्‍या चौघांना पोलिसांनी सापळा रचून तळेगाव दाभाडे येथे अटक केली. दिलेले पैसे वसुल करण्यासाठी अपहरण करण्याचा मार्ग अवलंबिलेल्या चौघांवर खंडणीचा गुन्हा (Extortion Case) दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

दत्तात्रय ऊर्फ आबा श्रीराम वारिंगे, महेश ब्रम्हदेव जाधव (वय ३२), सुभाष गोपाळ सोनजारी (वय ३०) आणि रवी हनुमंत अंकुशी (वय ३४, सर्व रा. तळेगाव दाभाडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime News)

 

याबाबत असिफ हुसेन शेख (वय ३८, रा. मुंब्रा, ठाणे) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु़ रजि़ नं ४२/२३) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे दाजी परेवझ मोहमंद शेख ऊर्फ प्रविण शशिकांत कुलकर्णी (पाटील) (वय ४५, रा. लोहगाव) व आरोपी हे मित्र आहेत़ प्रविण याने आरोपी यांच्याकडून ८ लाख रुपये घेतले होते. तो ते परत देत नव्हता. त्यांचा फोनही घेत नव्हता. शेवटी ते चौघे जण त्याला शोधत पुण्यात आले. पुणे सोलापूर रोडवरील फातिमानगर येथी हॉटेल श्रीसागर येथे आरोपींना प्रविण याला बोलावले. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तो तेथे आला. त्याच्याकडे पैशांची मागणी केल्यावर त्याने टाळाटाळ केली. तेव्हा त्यांनी प्रविण याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे नेले. पैसे दिल्याशिवाय सोडणार नाही, असे सांगितले. त्याला डांबून ठेवल्याची माहिती त्याच्या घरच्यांना पहाटे ४ वाजता समजली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

प्रविण याच्या नातेवाईकांनी संपर्क साधल्यावर पैसे मिळाल्याशिवाय सोडणार नसल्याचे सांगितले.
त्याला लाकडी स्टीक, लोखंडी रॉडने मारहाण केली.
त्यानंतर पोलिसांच्या सांगण्यानुसार त्याच्या नातेवाईकाने साडेसात लाख रुपये देत असल्याचे सांगितले.
त्यानुसार ते पैसे घेण्यासाठी आले असताना चौघांना पकडून प्रविण कुलकर्णी याची सुटका करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Friends abducted for not paying; Four arrested, case of extortion registered

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | तब्बल 3 महिन्यांनी खूनाचा गुन्हा दाखल; भारती विद्यापीठ पोलिसांनी केली तिघांना अटक

Beed News | व्हॉट्सअॅवर ‘आय एम सॉरी’ स्टेटस ठेवून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याने उचललं टोकाचं पाऊल

Pune Police Combing Operation | प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांची झाडाझडती; 27 कोयते जप्त, 37 जणांना अटक

 

The post Pune Crime News | पैसे देत नसल्याने मित्रांनीच केले अपहरण; चौघांना अटक, खंडणीचा गुन्हा दाखल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article