Header

Pune Crime News | 500 रुपयासाठी व्यावसायिकाचा सपासप वार करुन खून, आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पुणे जिल्ह्यातील घटना

Pune Crime News | 500 रुपयासाठी व्यावसायिकाचा सपासप वार करुन खून, आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पुणे जिल्ह्यातील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Pune Crime News | पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) जुन्नर येथे 500 रुपयांवरुन एका टुरिस्ट व्यावसायिकाचा (Tourist Professional) चाकूने सपासप वार करुन खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपीने स्वत:वर चाकूने वार (Stabbing) करुन घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempted Suicide) केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि24) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

विनायक उर्फ संतोष बबन गोडसे Vinayak alias Santosh Baban Godse (वय-42 रा. पिंपळवंडी) असे खून झालेल्या टुरिस्ट व्यावसायिकाचे नाव आहे. तर मयुर अशोक सोमवंशी Mayur Ashok Somvanshi (रा. राहुरी) असे आरोपीचे नाव असून त्याने स्वत:वर चाकुने वार करुन घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत गोडसे यांचे मित्र सचिन भिमाजी जाधव (Sachin Bhimaji Jadhav) यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात (Alephata Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी मयुर सोमवंशी याच्यावर आयपीसी 302, 504, 506, 507 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मित्र विनायक गोडसे यांची क्रुझर गाडी (एमएच 14 डीटी 5308) एक महिन्यापूर्वी दुरुस्तीसाठी पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune-Nashik Highway) हैदरभाई यांच्या गॅरेजमध्ये दिली होती. गाडी दुरुस्तीचे बिलाच्या 7 हजार 600 रुपयांपैकी 7 हजार 100 रुपये रोख दिले होते. गॅरेज कामगार मयुर सोमवंशी याला 500 रुपये देणे बाकी होते.

 

मयुर याने उर्वरित 500 रुपयासाठी गोडसे यांना फोन करुन तगादा लावला होता. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास आरोपी मयूर याने गोडसे यांना फोनकरुन शिवीगाळ केली तसेच गॅरेजवर ये तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. गोडसे हे आळेफाटा चौकातून गॅरेज कडे गेले. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून आरोपी मयुर याने गोडसे यांच्या छातीवर चाकूने सपासप वार केले. यानंतर त्याने स्वत:वर देखील वार करुन घेतले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

या घटनेत जखमी झालेल्या गोडसे यांना तातडीने आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल
केले. याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
सचिन जाधव यांच्या फिर्य़ादीवरुन पोलिसांनी मयुर सोमवंशी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

दरम्यान आरोपी मयुर याने स्वत:वर देखील वार करुन घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये जखमी झालेल्या मयुर याच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात पोलीस बंदोबस्तात उपचार सुरु आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे (Police Inspector Yashwant Nalavde) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | murder of tourist business man in junnar pune over 500 rupees

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | इन्स्टाग्रामवर पुष्पा सिनेमा स्टाईल स्टेटस ठेवल्याच्या कारणावरुन विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफात राडा, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime News | 24 वर्षीय मोठया बहिणीकडून 18 वर्षीय लहान बहिणीचा विनयभंग, अंगावरून हात फिरवत प्रायव्हेट पार्टला केला स्पर्श

 

The post Pune Crime News | 500 रुपयासाठी व्यावसायिकाचा सपासप वार करुन खून, आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पुणे जिल्ह्यातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article