Pune Crime News | इन्स्टाग्रामवर पुष्पा सिनेमा स्टाईल स्टेटस ठेवल्याच्या कारणावरुन विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफात राडा, पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे. मात्र आता हीच ओळख पुसट होताना पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) दहावीत शिक्षणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्यानंतर आता पुण्यात देखील अशाच प्रकारची घटना घडली आहे. इनस्टाग्रामवर (Instagram) पुष्पा (Pushpa) सिनेमा स्टाईल स्टेटस (Status) ठेवल्याच्या कारणावरुन विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान राडा झाला. पुण्यातील उरुळी कांचन येथील मनीभाई देसाई महाविद्यालयाच्या (Manibhai Desai College) परिसरात ही घटना (Pune Crime News) घडली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
एक वर्षापूर्वी झालेल्या प्रेम प्रकरणावरुन (Love Affair) अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाला होता. त्यातून दोन गटात वादावादी झाली. याचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन गटात झालेल्या हाणामारीत चार जण तरुण झाले आहेत. याबाबत मंगळवारी (दि.24) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) परस्परविरोधी गुन्हे (FIR) दाखल करुन 11 जणांना ताब्यात घेतले आहे. कॉलेजच्या बाहेरच विद्यार्थ्यांचे हे दोन गट एकमेकांना भिडले.
प्रेम दत्तात्रय कांचन, जयेश सुदाम कांचन, ऋषिकेश चांदगुडे, चैतन्य अप्पासो महाडिक,
प्रथमेश दत्तात्रय कांचन आणि तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. यातील एक अल्पवयीन मुलगा आणि त्याचे मित्र मंगळवारी
सकाळी दहाच्या सुमारास कॉलेज जवळ थांबले होते. त्यावेळी दुसऱ्या गटातील काही विद्यार्थी त्या ठिकाणी आले.
आरोपींनी इन्स्टाग्रामवर पुष्पा सिनेमा स्टाईल स्टेटस ठेवल्याचा जाब विचारला.
याचे कारण देण्यास नकार दिला असता आरोपींनी अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या मित्रांना शिवीगाळ
करुन मारहाण केली. यातील एकाने हातातील लोखंडी रॉडने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना मारहाण करुन
जखमी केले. पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime News | pune viral video instagram status of pushpa style dispute read story pune crime news today
हे देखील वाचा :
Pune Crime News | सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रोडवरील गोळीबाराला वेगळे वळण; खंडणीचा गुन्हा दाखल
The post Pune Crime News | इन्स्टाग्रामवर पुष्पा सिनेमा स्टाईल स्टेटस ठेवल्याच्या कारणावरुन विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफात राडा, पुण्यातील धक्कादायक घटना appeared first on बहुजननामा.