Header

Pune Crime News | कॅनॉलमध्ये उडी मारुन तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; मृतदेह मिळून न आल्याने बनावाचा संशय

Pune Crime News | कॅनॉलमध्ये उडी मारुन तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; मृतदेह मिळून न आल्याने बनावाचा संशय

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | कॉलेजमधून पेपर सोडवून ती वडगाव येथे आली. आपली बॅग तिने काठावर ठेवून कॅनॉलमध्ये उडी घेतली. हे दोघा मुलांनी पाहिले, अग्निशमन दलाने (Fire Brigade Pune) तिचा शोधही घेतला. पण ती कोठे मिळून आली नाही. त्यामुळे तिने हा बनाव करुन तिला कोणीतरी पळवून नेल्याचा तिच्या पालकांचा संशय आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत हिंगणे खुर्द (Hingne Khurd, Pune) येथील ४६ वर्षाच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वडगाव येथील माणिकबागमधील (Manikbaug Pune) पी. जोग ज्युनिअर कॉलेजमध्ये ९ जानेवारी रोजी दुपारी पाऊण वाजता घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १७ वर्षाची मुलगी पी़ जोग कॉलेजमध्ये
कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहे. सोमवारी ती परिक्षेला गेली होती.
दुपारी ती प्रश्नपत्रिका सोडवून वर्गातून बाहेर पडली. मोबाईलवर बोलत ती कालव्याजवळ गेली.
तिने कालव्यात उडी मारली. तेथून जात असलेल्या दोन तरुणांनी हा प्रकार पाहिला.
त्यांनी पोलिसांना तसेच अग्निशमन दलाला कळविले. त्यांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला.
परंतु, ती मिळून आली नाही. या मुलीची बॅग काठावर मिळून आली आहे.
त्यामुळे तिचा पालकांना तिला कोणीतरी पळवून नेले असावे, असा संशय आहे.
त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक साबळे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | A young woman’s suicide attempt by jumping into a canal; Suspicion of forgery as the body was not found

 

हे देखील वाचा :

MLA Bachchu Kadu | आमदारांच्या अपघाताची मालिका सुरुच, रस्ता ओलांडताना आमदार बच्चू कडूंचा अपघात; गंभीर जखमी

Hasan Mushrif | माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागलमधील घरावर ईडीची छापेमारी

Pune Crime News | आजोबाच करत होते 11 वर्षाच्या नातीसोबत अश्लिल चाळे; शाळेतील गुड टच बॅड टच कार्यक्रमातून झाले उघड

 

The post Pune Crime News | कॅनॉलमध्ये उडी मारुन तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; मृतदेह मिळून न आल्याने बनावाचा संशय appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article