Header

Pune Crime News | कोयता गँगचा गोर्‍हे गावात धुडगुस; सिगारेटसाठी कोयत्याचा धाक दाखवून धमकावले

Pune Crime News | कोयता गँगचा गोर्‍हे गावात धुडगुस; सिगारेटसाठी कोयत्याचा धाक दाखवून धमकावले

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | सिगारेट दिली नाही या कारणावरुन मोटारसायकलवरुन आलेल्या ११ जणांनी सिंहगड -पानशेत रोडवरील गोर्‍हे गावात (Sinhagad – Panshet Road, Gorhegaon) धुडगुस घातला. हवेत कोयते फिरवून येणार्‍या जाणार्‍याला धमकावून जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी घडला. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी एका महिला दुकानदाराने हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नचिकेत संजय जगताप, सुरज लगींदर ठाकूर, यश संजय जगताप, अक्षय चव्हाण ऊर्फ चपाती मोन्या, अनुप शेलार, निलेश सहा, सागर कांतू पाटील, अक्षय पारगे, अनिकेत मोरे, करण शिंदे, पंकज दिलीप चव्हाण (सर्व रा. गोर्‍हे बुद्रुक) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या त्यांच्या दुकानात असताना टोळके मोटारसायकलवरुन आले. त्यांनी फिर्यादीकडे सिगारेट मागितली. दुकानात सिगारेट नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर ते मोटारसायकल जोरात रेस करुन चालवू लागले. त्यांच्या शेजारील एका आजीला ते कट मारुन जाऊ लागले. पुढे जाऊन पुन्हा गाडी वळवली. तेव्हा फिर्यादी यांच्या शेजारी राहणार्‍यांनी मुले खेळत आहेत, मोटार सायकल हळू चालवा, असे यश जगताप याला सांगितले. तेव्हा या टोळक्याने त्यांना शिवीगाळ करून दमदाटी करुन मारहाण करण्यासाठी त्यांचे अंगावर धावून जाऊ लागले. तेव्हा फिर्यादीमध्ये पडल्याने यश जगताप यांनी त्यांना ढकलून दिल्याने त्या रोडवर खाली पडल्या. जमलेल्या लोकांनी त्यांना निघून जाण्यास सांगितले.

 

तेव्हा ते निघून गेले. मात्र, पाच मिनिटांनी सर्व जण पुन्हा आले.
गोरखचे सलूनजवळ मोटार सायकली उभ्या करुन व येणार्‍या जाणार्‍या लोकांना शिवीगाळ -दमदाटी करुन हातातील कोयता दाखवुन दहशत पसरु लागले.
त्यानंतर ते फिर्यादी यांच्या घरासमोर आले व त्यांच्या पतीला शिवीगाळ करु लागले.
तो घरी नसल्याचे पाहून त्यांच्या भावाच्या घरी जाऊ लागले. तेव्हा फिर्यादी यांनी तेथे जाऊन घराचे गेट बंद केले.
त्यांनी फिर्यादी यांच्या भावाला बोलावून दमदाटी करु लागले. कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ केली.
सर्वांना शिवीगाळ करुन परिसरात दहशत निर्माण करुन ते काही वेळाने मोटारसायकलवरुन निघून गेले.
हवेली पोलीस तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime News | Koyta Gang sinhagad Panshet Road Haveli Police Station

 

हे देखील वाचा :

Aditya Thackeray | आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटाला सवाल; म्हणाले – ‘बाळासाहेबांच्या सुपुत्राने जेव्हा…’

Pune News | भाजप शहरअध्यक्ष व पदाधिकार्‍यांना छत्रपती संभाजी महाराजांच्याच नावाचा विसर?

 

The post Pune Crime News | कोयता गँगचा गोर्‍हे गावात धुडगुस; सिगारेटसाठी कोयत्याचा धाक दाखवून धमकावले appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article