Header

Pune Crime News | तूझा माज उतरवतो म्हणत टोळक्याने केला रिक्षाचालकावर कोयत्याने वार; लोहियानगरमधील घटनेत तिघांना अटक

Pune Crime News | तूझा माज उतरवतो म्हणत टोळक्याने केला रिक्षाचालकावर कोयत्याने वार; लोहियानगरमधील घटनेत तिघांना अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | भावाला मारहाण (Beating) का केली, अशी विचारणा करुन तूझा माजच उतरवतो, असे म्हणून चौघांनी रिक्षाचालकावर कोयत्याने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी खडक पोलिसांनी चौघांना अटक (Arrest) केली आहे. अजय रामप्पा बॅगरी (वय २१), शैलेश ऊर्फ साहील रामप्पा बॅगरी (वय २१), अनिकेत व्यंकटेश कोळी (वय २१) आणि भरत व्यंकटेश कोळी (वय १८, सर्व रा. लोहियानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अजय, शैलेश आणि भरत हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

 

याबाबत प्रेम अनिल पाटोळे (वय २६, रा. पिंपळमाळा, कासेवाडी) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २३/२३) दिली आहे. ही घटना लोहियानगरमधील अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर शनिवारी रात्री साडेदहा वाजता घडली. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम पाटोळे हे रिक्षाचालक आहेत. आरोपी हे फिर्यादीच्या ओळखीचे आहेत.
शनिवारी रात्री ते अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर असताना अनिकेत कोही याने फिर्यादीला तू माझा भाऊ भरत
कोळी याला मारहाण का केली अशी विचारणा करुन शिवीगाळ केली.
तेव्हा फिर्यादीने शिवीगाळ का करता, असे विचारल्यावर त्यांनी तला जास्त माज आला का, आज तुझा माजच
उतरवतो, असे बोलून कोयता बाहेर काढून फिर्यादीच्या डोक्यावर वार केला.
तेव्हा फिर्यादीने डावा हात आडवा धरला. तो वार फिर्यादीच्या हाताचे बोटावर, दंडावर बसला.
अनिकेत याने कोयत्याने फिर्यादीच्या पाठीवर व डोक्यावर कोयत्याने मारहाण केली.
फिर्यादी तेथून पळून जाऊ लागले, तेव्हा शैलेश व भरत याने लाकडी बांबुने त्यांना मारहाण केली.
पोलिसांनी चौघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक विटे तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime News | The gang attacked the rickshaw puller with a knife saying, “You are getting off my car”; Three arrested in Lohianagar incident

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime News | नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लाखोंचा गंडा, आरोपी गजाआड; वाकड परिसरातील घटना

Buldhana Accident | धक्कादायक! 19 वर्षीय विद्यार्थ्याचा बाईक अपघातात दुर्दैवी मृत्यू

Aditya Thackeray | आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटाला सवाल; म्हणाले – ‘बाळासाहेबांच्या सुपुत्राने जेव्हा…’

 

The post Pune Crime News | तूझा माज उतरवतो म्हणत टोळक्याने केला रिक्षाचालकावर कोयत्याने वार; लोहियानगरमधील घटनेत तिघांना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article