Header

Pune Crime News | कर्जबाजारी झालेल्याने महिलेला लुटण्याचा प्रकार आला अंगाशी; कात्रजमधील संतोषनगर येथील घटना

Pune Crime News | कर्जबाजारी झालेल्याने महिलेला लुटण्याचा प्रकार आला अंगाशी; कात्रजमधील संतोषनगर येथील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पायी जाणार्‍या महिलेच्या कानातील सोन्याची वेल जबरदस्तीने ओढून व कापून चोरुन नेल्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध करताच आजू बाजूच्या लोकांनी या चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. कर्जबाजारी झाल्याने त्याने चोरीचा प्रयत्न केल्याचे चौकशीत समोर आले आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

गणेश हनुमंत कदम (वय २३, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी, हडपसर) असे या चोरट्याचे नाव आहे. ही घटना कात्रजमधील संतोषनगर येथील गल्ली नं. ७ मध्ये सोमवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता घडली. (Pune Crime News)

 

याबाबत जाधवनगरमधील एका ३८ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४५/२३) दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या सासुसह संतोषनगरमधील गल्ली क्रमांक ७ मधून पायी जात होत्या.
त्यावेळी त्यांच्या पाठीमागून एक जण आला व त्याने त्यांच्या कानातील सोन्याचे वेल जबरदस्तीने ओढून चोरण्याचा
प्रयत्न केला. वेल निघत नाही म्हटल्यावर त्याने तो कापण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा फिर्यादी यांनी त्याला विरोध करीत आरडाओरडा केला.
त्यामुळे आजू बाजूच्या लोकांचे लक्ष गेल्यावर त्यांनी या चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गणेश कदम हा फॉर्मास्टि आहे.
तो कर्जबाजारी झाल्याने त्याने चोरीचा प्रयत्न केल्याचे चौकशीत उघड झाले.
पोलीस उपनिरीक्षक गुप्ता तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime News | A woman was robbed by a debtor; Incident at Santoshnagar in Katraj

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime News | घरमालकीनीचा भाडेकरुनेच केला विनयभंग, आरोपी गजाआड; दिघी परिसरातील घटना

Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून संजय राऊत यांनी सरकारला फटकारले; म्हणाले…

Union Budget 2023 | यंदाच्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांसाठी आनंदाची बातमी; अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे सुतोवाच

 

The post Pune Crime News | कर्जबाजारी झालेल्याने महिलेला लुटण्याचा प्रकार आला अंगाशी; कात्रजमधील संतोषनगर येथील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article