Header

Pune Crime News | मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरुन टोळक्याकडून तरूणावर चाकूने वार; घटना शंकरशेठ रोडवरील

Pune Crime News | मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरुन टोळक्याकडून तरूणावर चाकूने वार; घटना शंकरशेठ रोडवरील

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | मित्राच्या वाढदिवसांच्या पार्टीवरुन जाताना मोटारसायकलवरुन ओव्हर टेक केल्याने झालेल्या बाचाबाचीतून टोळक्याने तरुणाला लाथाबुक्यांनी मारहाण (Beating) करुन चाकूने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी अशितोष रघुनाथ यादव Ashitosh Raghunath Yadav (वय ४०, रा. काशेवाडी, भवानी पेठ) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २०/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संतोष सिद्धु पामाकोळ, हनुमंत येलाल, सुरेश कोळी, मनोज ससाणे यांना अटक (Arrest) केली आहे. ही घटना शंकरशेठ रोडवरील आनंद पार्क सोसायटीचे कमानीजवळील खाऊ गल्लीत रविवारी रात्री नऊ वाजता घडली. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीतून जात होते.
त्यावेळी आरोपी संतोष पामाकोळ याने फिर्यादीच्या मोटारसायकलला धोकादायकरित्या ओव्हरटेक केले होते. त्यावरुन त्यांच्यात बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात धरुन हा वाद मिटविण्यासाठी आरोपींनी फिर्यादी याला बोलावून घेतले. फिर्यादी गेला असताना वाद मिटविण्याऐवजी त्यांनी सर्वांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. संतोष याने त्याच्याकडील फायटरने मारुन जखमी केले. सुरेश कोळी याने धारदार चाकूने फिर्यादीवर सपासप वार करुन गंभीर जखमी केले. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे. मनोज ससाणे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पोलीस उपनिरीक्षक भोसले (PSI Bhosale) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | Youth stabbed by gang for slashing motorcycle; Incident on Shankarsheth Road

 

हे देखील वाचा :

Marathwada Teacher Constituency Election | मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बंडखोरीचा फटका; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने केली बंडखोरी

MP Sanjay Raut | ‘यापुढे आम्ही आमच्या भूमीका ठरवू’, संजय राऊतांचा मित्रपक्षांना सूचक इशारा

Pune PMC News | टिळेकरनगर येथील रस्त्याच्या कामाच्या निविदेत भ्रष्टाचार ! माजी आमदाराच्या दबावाखाली निविदेतील अटी शर्ती बदलल्या; अधिकारी व सल्लागारांचे निलंबन करून फेरनिविदा मागवावी – काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे

 

The post Pune Crime News | मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरुन टोळक्याकडून तरूणावर चाकूने वार; घटना शंकरशेठ रोडवरील appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article