Pune Crime News | सोसायटीचा मेंटेनन्स न भरल्याने बिल्डरने मारहाण करुन केला हात फ्रॅक्चर; मुंढवा परिसरातील घटना
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | सोसायटीचा मेंटेनन्स न भरल्याने बिल्डरने (Builder) दोघा तिघांना बरोबर घेऊन एका रहिवाशाला लोखंडी रॉडने मारहाण (Beating) करुन त्यांचा हात फ्रॅक्चर केल्याचा धक्कादायक प्रकार मुंढव्यात घडला.
याप्रकरणी दीपक साहेबराव फडतरे (वय ४०, रा. श्रीकृपा सोसायटी, बालाजी रेसिडन्सी, केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तुषार शहा (रा. खराडी) व त्यांच्या दोन ते तीन साथीदारांवर गुन्हा (FIR) दखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुषार शहा हा सोसायटीचा बिल्डर आहे.
फिर्यादी यांनी सोसायटीचा मेंटेनन्स भरला नाही.
या कारणावरुन शनिवारी रात्री साडेआठ वाजता बिल्डर तुषार शहा (Builder Tushar Shah) व त्याचे
साथीदार सोसायटीत आले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने मारहाण केली.
त्यात फिर्यादी यांचा हात फ्रॅक्चर झाला. सहायक पोलीस निरीक्षक सुतार तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime News | Due to non-payment of the society’s maintenance, the builder beat and fractured his hand; Incidents in Mundhwa area
हे देखील वाचा :
The post Pune Crime News | सोसायटीचा मेंटेनन्स न भरल्याने बिल्डरने मारहाण करुन केला हात फ्रॅक्चर; मुंढवा परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.