Pune Crime News | मांज्यामुळे हॉटेल व्यवसायिकाचा कापला गेला गळा; वारजे येथील घटना
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | नायलॉनच्या मांजा (Nylon Manja) पायात अडकल्याने अनेक पक्षी अडकले. काही जणांच्या प्राणावर बेतले असतानाच रविवारी मांज्यामुळे एका हॉटेल व्यावसायिकाचा गळा कापला गेला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
श्रीकांत लिपाणे Srikanth Lipane (वय २७) असे या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. ही घटना वारजे येथील ढोणेवाडा (Dhonewada, Warje) जवळ रविवारी दुपारी साडेचार वाजता घडली.
याप्रकरणी निखील गोपीनाथ लिपाणे (वय २९, रा. जांभुळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं.२९/२३) दिली आहे. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत लिपाणे हे मोटारसायकलवरुन सर्व्हिस रोडने रविवारी दुपारी
जात होते. त्यावेळी ढोणेवाडा जवळ त्यांच्यासमोरुन मांजा आला. त्याने त्यांचा गळा कापला गेला.
हे पाहून लोकांनी तातडीने त्यांना माई मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. आता त्यांची प्रकृती सुधारत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime News | A hotelier’s throat was cut due to a bite; Incident at Warje
हे देखील वाचा :
The post Pune Crime News | मांज्यामुळे हॉटेल व्यवसायिकाचा कापला गेला गळा; वारजे येथील घटना appeared first on बहुजननामा.