Header

Pune Crime News | जेएम रोडवरील खाऊ गल्लीत महिलेवर कोयता उगारून दहशत निर्माण करणार्‍या चौघांना अटक

Pune Crime News | जेएम रोडवरील खाऊ गल्लीत महिलेवर कोयता उगारून दहशत निर्माण करणार्‍या चौघांना अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Pune Crime News | जंगली महाराज रस्त्यावरील (JM Road, Pune) जे.एम. कॉर्नर या खाऊगल्लीमध्ये गुरूवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास खाद्य पदार्थ विक्री करणार्‍या महिलेवर कोयता उगारून (Koyta Gang, Pune) त्यांना जीवे मारण्याची धमकी देवून परिसरात दहशत निर्माण करणार्‍या टोळीतील चौघांना शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police) अटक केली आहे. त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

रणजित रघुनाथ रामगुडे (20), रोहन गोरख सरक (19, दोघे रा. विठ्ठल मंदिराशेजारी, सुतार चाळ, सुतारवाडी, पाषाण), विशाल शंकर सिंह (18, रा. ओमकार गणेश मंदिराजवळ, संगमवाडी) आणि आदित्य राजेश वडसकर (19, रा. शिवाजीनगर गावठाण, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, अटक आरोपी आणि त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी दि. 5 जानेवारी रोजी जे.एम. कॉर्नर या खाऊगल्लीमध्ये एका खाद्य पदार्थ विक्री करणार्‍या महिलेवर कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी दिली होती. परिसरात दहशत निर्माण करून हौदोस घातला होता. (Pune Crime News)

 

शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने (Sr PI Arvind Mane),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड (PI Vikram Gaud), सहाय्यक निरीक्षक भोलेनाथ अहिवळे
(API Bholenath Ahivale) आणि तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यानंतर आरोपींची ओळख पटविण्यात आली.
आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करण्यात आले. आरोपींकडून गुन्हयात वापरलेले चार लोखंडी कोयते आणि 4 दुचाकी गाडया असा एकुण 1 लाख 25 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill), सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर
(ACP Satish Govekar), वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनखाली
पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड, सहाय्यक निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलिस अंमलदार अविनाश भिवरे,
गणपत वाळकोळी, बशीर सय्यद, रणजित फडतरे, आदेश चलवादी आणि दिलीप नांगरे यांच्या पथकाने
आरोपींना अटक केली आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Shivaji Nagar Police Four people were arrested for creating terror by raising a knife on a woman in Khau Galli on JM Road Pune

 

हे देखील वाचा :

Apurva Nemlekar | अपूर्वासाठी केलेल्या बॅनरबाजीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल; ‘भरघोस मतदान करून…’

Sania Mirza Retirement | सानिया मिर्झा टेनिसमधून घेणार निवृत्ती; ‘या’ ठिकाणी खेळणार शेवटचा सामना

Pune Crime News | घरात शिरुन तरुणीवर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी; बोपोडीतील घटना

The post Pune Crime News | जेएम रोडवरील खाऊ गल्लीत महिलेवर कोयता उगारून दहशत निर्माण करणार्‍या चौघांना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article