Header

Ratan Raajputh | ‘या’ कारणामुळे टीव्ही-युट्युबवरुन गायब होती अभिनेत्री रतन रजपूत; केला मोठा खुलासा

Ratan Raajputh | ‘या’ कारणामुळे टीव्ही-युट्युबवरुन गायब होती अभिनेत्री रतन रजपूत; केला मोठा खुलासा

बहुजननामा ऑनलाईन – अभिनेत्री रतन रजपूत (Ratan Raajputh) नेहमीच तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात तिचे वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. झी टीव्ही वरील ‘अगले जनम मोहें बिटियाही कीजो’ या मालिकेतून ती प्रेक्षकांसमोर आली होती. या मालिकेत ती लाली ही भूमिका साकारत होती. या भूमिकेमुळे ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. रतनचा (Ratan Raajputh) आता मोठा चाहता वर्ग देखील निर्माण झाला आहे. मात्र काही दिवसांपासूनच रतन छोट्या पडद्यापासून गायब झाली आहे. सध्या ती कोणत्याही मालिकेत दिसून येत नाही.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

रतनने जरी छोट्या पडद्यावरून ब्रेक घेतला असला तरी तिने स्वतःच एक यूट्यूब चॅनल सुरू केल आहे. सध्या ती आपल्या गावी परतली असून तेथील अनेक गोष्टींची माहिती ती युट्युबच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहून देत असते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून रतन youtube वरून देखील गायब असल्याचे दिसत होते. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तिने पुन्हा युट्युब वर सक्रिय होत मागील काही दिवसांपासून युट्युब पासून लांब राहण्याचे कारण देखील सांगितले आहे.

 

यावेळी रतनने (Ratan Raajputh) म्हटले की, “मला माहित आहे माझ्या या अचानक गायब होण्यामुळे
तुम्ही सर्वजण चिंतेत आहे. परंतु यावर मी काही करू शकत नाही शेवटी माझं आयुष्यच असे आहे.
इतके दिवस मी माझ्या घरी राहत होते परंतु आता सध्या मी माझ्या मामाच्या घरी आली आहे. मी गेल्या तीन वर्षापासून सायकॉलॉजीचा अभ्यास करत आहे. यासाठी मी एका महिन्याचा न्यूरोथेरेपीचा कोर्ससुद्धा करत असल्यामुळे युट्युब पासून लांब होते. सर्टिफिकेट साठी किंवा डिग्रीसाठी मी हा अभ्यास करत नाहीये. मला या गोष्टीचा आवड असल्यामुळे मी ते करत आहे. अजून चार दिवस मला हा अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर मी यातून मोकळी होणार आहे. त्यानंतर आपण परत अनेक व्हिडिओ मधून धमाल करूयात”.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Ratan Raajputh | ratan rajput breaks silence on his disappearance from tv youtube

 

हे देखील वाचा :

IND VS SL | तिसऱ्या T-20 सामन्यात कोण मारणार बाजी? कधी, कुठे पहाल सामना?

Pune Crime News | जेएम रोडवरील खाऊ गल्लीत महिलेवर कोयता उगारून दहशत निर्माण करणार्‍या चौघांना अटक

Sania Mirza Retirement | सानिया मिर्झा टेनिसमधून घेणार निवृत्ती; ‘या’ ठिकाणी खेळणार शेवटचा सामना

 

The post Ratan Raajputh | ‘या’ कारणामुळे टीव्ही-युट्युबवरुन गायब होती अभिनेत्री रतन रजपूत; केला मोठा खुलासा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article