Pune Pimpri Crime | भाऊ नाही बाबु बोलायचं असे म्हणत एकाला बेदम मारहाण, पिंपरीतील घटना
पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Crime | मला भाऊ नाही बाबु म्हणायचे असे म्हणत दोन जणांनी एका युवकाला काठीने बेदम मारहाण (Beating) करुन गंभीर जखमी केले आहे. ही घटना (Pune Pimpri Crime) 6 जानेवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास नेरहरुनगर येथील झिरो बॉईज चौकात (Zero Boys Chowk) घडली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत दिनेश सुरेश पंचरास Dinesh Suresh Pancharas (वय-33 रा. विठ्ठलनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) सोमवारी (दि.9) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सुहास विष्णु शिंदे (वय-26 रा. ससाने चाळ, पिंपरी), अंगुली सुधाकर घनघाव (वय-22 रा. टाकळे चाळ, पिंपरी) यांच्या विरुद्ध आयपीसी 326, 323, 504, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश हे झिरो बॉईज चौकात जेवणाचे पार्सल आणण्यासाठी गेले होते.
त्यावेळी आरोपींनी मला भाऊ नाही म्हाणायचे बाबु बोलायचे असे म्हणून दिनेश यांना शिवीगाळ केली.
तसेच तु शिस्तीत रहा असे म्हणत दोघांनी लाथाबुक्यांनी माराहण करुन लाकडी दांडक्याने फिर्यादी यांच्या डोळ्याच्या
भुवईजवळ, डोक्याच्या मागे, पायावर आणि पाठीवर मारहाण केली.
यामध्ये दिनेश पंचरास हे जखमी झाले असून त्यांनी सोमवारी याबाबत फिर्याद दिली आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Crime | A man was brutally beaten saying that he wanted to talk about brother and not father, an incident in Pimpri
हे देखील वाचा :
Navneet Rana | हनुमान चालिसा प्रकरण : दोषमुक्तीसाठी राणा दाम्पत्याची विशेष कोर्टात धाव
Pune News | युनेस्को पुरस्कार ‘कलानिपुण’च्या चैत्राली जोशी, काव्या केंची यांना
The post Pune Pimpri Crime | भाऊ नाही बाबु बोलायचं असे म्हणत एकाला बेदम मारहाण, पिंपरीतील घटना appeared first on बहुजननामा.