Header

Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार यांच्या आव्हानाला संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘सरकारमधले जे अतिशहाणे मंत्री आहेत त्यांनी…’

Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार यांच्या आव्हानाला संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘सरकारमधले जे अतिशहाणे मंत्री आहेत त्यांनी…’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगत असाल तर माझं आव्हान आहे की 15 मार्च पर्यंत सरकार पाडून दाखवा. असं सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी म्हटलं होतं. त्यावर संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, सरकारमधील जे अतिशहाणे मंत्री आहेत त्यांनी जरा आपले कान कोरुन त्यांनी मला आव्हान दिलंय की मार्चपर्यंत सरकार पाडून दाखवा. जरा कानातले बोळे काढा. कान साफ करा, कानकोरणी हवी तर मी पाठवतो. मी असं म्हटलं आहे की न्यायालयाचा निकाल फेब्रुवारीपर्यंत लागणं अपेक्षित आहे त्यानंतर सरकार पडेल, असा टोला संजय राऊतांनी सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना लगावला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय म्हणाले होते मुनगंटीवार ?

शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत यांनी राज्यातील सरकार फेब्रुवारी महिन्यात पडणार असल्याचे म्हटले आहे. यावर मंत्री सुधीर मुनगंटीवर (Sudhir Mungantiwar)म्हणाले, संजय राऊत यांना सांगतो की त्यांनी फेब्रुवारी कशाला मार्चपर्यंत सरकार पाडून दाखवावं. नाहीतर बाळासाहेबांचा वारसा नकली असल्याचे सिद्ध होईल. हे सरकार फेब्रुवारीच्या पुढेही टिकलं तर राऊत राज्यसभेचा राजीनामा देणार आहेत का? त्यांच्याकडचे कार्यकर्तेही टिकत नसल्याने संजय राऊत अशी वक्तव्य करत आहे. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) वारसा सांगत असाल तर माझं आव्हान आहे की 15 मार्च पर्यंत सरकार पाडून दाखवा.

 

तर मी कान कोरणी पाठवतो

निवडणूक आयोगात (Election Commission) शिवसेना कुणाची याचाही फैसला होण्याची शक्यता आहे.
या सगळ्यावर संजय राऊत यांनी जेव्हा पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा 14 फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस आहे
त्यामुळे सगळं काही प्रेमाने हेईल असं संजय राऊत म्हणाले.
तसचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावत एकदा कानातले बोळे काढून मी काय बोललो होतो ते नीट ऐका.
हवं असेल तर कान कोरणी पाठवतो असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

संजय राऊत यांनी यापूर्वी शिंदे गटाच्या आमदारांवर (Shinde Group MLA) त्यांनी अनेकदा टीका केली आहे.
गद्दार, कचरा असाही त्यांचा उल्लेख केला आहे.
आता संजय राऊत यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा उल्लेख सरकारमधील अतिशहाणे मंत्री असा केल्याने भाजप
(BJP) कशा प्रकारे प्रत्युत्तर देते हे पाहावे लागेल.

 

 

Web Title :- Sudhir Mungantiwar | a very wise minister in the government should clean his ears and listen to what i have said sanjay raut taunts sudhir mungantiwar

 

हे देखील वाचा :

Pune News | युनेस्को पुरस्कार ‘कलानिपुण’च्या चैत्राली जोशी, काव्या केंची यांना

IND vs SL 1st ODI | आजपासून भारत- श्रीलंका वनडे मालिकेला सुरुवात; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सामना

Nanded Firing Case | नांदेडमध्ये महिला काँग्रेस कार्यकर्त्यावर गोळीबार

Pune Crime News | हौसेकरिता अग्नीशस्त्रे बाळगणार्‍यास कोंढवा पोलिसांकडून अटक; 2 पिस्तुलांसह 4 जिवंत काडतुसे जप्त

 

The post Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार यांच्या आव्हानाला संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘सरकारमधले जे अतिशहाणे मंत्री आहेत त्यांनी…’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article