Header

Sunil Holkar Death | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील मराठमोळ्या अभिनेत्याचे निधन

Sunil Holkar Death | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील मराठमोळ्या अभिनेत्याचे निधन

बहुजननामा ऑनलाईन –   Sunil Holkar Death | हिंदी भाषेतील सुप्रसिद्ध ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील मराठमोळे अभिनेते सुनिल होळकर यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 40 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळं संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळं अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

अशोक हांडे यांच्या चौरंग नाट्य संस्थेत त्यांनी बरीच वर्ष काम केलं. अभिनेता आणि निवेदक अशी त्यांची विशेष ओळख होती. जवळपास 12 वर्षांहून अधिक काळ त्यांनी रंगभूमीची प्रामाणिक सेवा केली. याचमुळे मराठी मनोरंजन विश्वातून सुनील यांच्या निधनाची हळहळ व्यक्त केली जात आहे. नाटक आणि मालिकांसोबतच त्यांनी अनेक मराठी सिनेमांमध्येही काम केलं. हिंदी मालिकाविश्वात ते सहाय्यक भूमिकांसाठी विशेष ओळखले जायचे. (Sunil Holkar Death)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

‘गोष्ट एका पैठणीची’, ‘मोरया’ या सारख्या अनेक चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची चमक दाखवली.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘मॅडम सर’, ‘मि. योगी’ अशा अनेक मालिकांतून तर ‘भुताटलेला’ वेब सिरीज
मधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांच्या माघारी पत्नी एक मुलगा असा परिवार आहे.

 

Web Title :- Sunil Holkar Death | sunil holkar passes away he acted in taarak mehta ka ooltah chashmah and gosht eka paithanichi

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | आंबेगावात तरुणाचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून

Pune Crime News | कोरेगाव पार्क येथे गोळीबार करुन दहशत माजवणाऱ्या अजय साळुंके याच्यासह 5 जणांवर ‘मोक्का’

Dilip Walse-Patil | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांचे भाजपवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले…

Pune Crime News | एटीएममधून पैसे न आल्याने गुगलवरुन केला संपर्क; सायबर चोरट्याने केले बँक खाते रिकामे

 

The post Sunil Holkar Death | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील मराठमोळ्या अभिनेत्याचे निधन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article