Akola Crime News | शेतात मोटार सुरू करताना विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू
अकोला : बहुजननामा ऑनलाईन – Akola Crime News | शेतकरी आपल्या शेतीला प्राणापेक्षाही जास्त जपत असतो. आपल्या पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी दिवसरात्र त्यासाठी झटत असतो. सध्या अशीच एक घटना अकोल्यातील शेतकऱ्याच्या बाबतीत घडली आहे. पहाटे पाच वाजता शेतात विजेचा शॉक लागून एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. हा शेतकरी शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी पाण्याची मोटार सुरु करायला गेला होता. यादरम्यान अचानक मोटरमध्ये बिघाड झाला आणि या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. मंगेश फाळके (वय 32) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृत मंगेश हे घरातील कर्ता पुरुष होते. ते आपल्या आईसह त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. आता घरातील कर्ता पुरुष गेल्याने फाळके कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला आहे. मृत मंगेश यांचा त्यांच्या आईसमोर तडफडून मृत्यू झाला. (Akola Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चतारी गावात मंगेश फाळके (वय 32) यांचं कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे एकूण अडीच एकर शेती असून त्यामध्ये गव्हाचे पिक घेतले आहे. दरम्यान रब्बी हंगामातील गव्हाला सध्या पाणी देण्याचे काम सुरु आहे. मंगेश आणि त्यांची आई हे नियमितप्रमाणे काल दुपारी 11 वाजता शेतात गेले होते. यानंतर त्यांनी गव्हाला पाणी देण्यासाठी कॅनॉलजवळील पाण्याची मोटार सुरु केली. परंतू मोटर सुरू झाली नाही. त्यामुळे मोटर का सुरू झाली नाही? हे पाहण्यासाठी मंगेश यांनी मोटरची बारकाईने पाहणी केली. परंतु पाहणी करत असताना मोटर पंपमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यात त्यांना जोरदार विजेचा शॉक लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना घडली तेव्हा मंगेश यांची आईदेखील त्या ठिकाणी उपस्थित होती. त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी चान्नी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. (Akola Crime News)
कर्ता पुरुष गमावल्याने फाळके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
मृत मंगेश फाळके यांच्या वडिलांचं दोन वर्षांपुर्वी दुःखद निधन झाले होते. त्यांच्या माघारी पत्नी, चार मुली,
एक मुलगा असा परिवार आहे. यामधील चारही मुलींचे लग्न झाले असून मुलगा मंगेश हा सर्वात लहान आहे.
वडिलांच्या निधनानंतर आई, पत्नी अन् स्वतःच मुलगा यांची जबाबदारी मंगेश यांच्यावर होती.
आता कुटुंबातील प्रमुख कर्ता पुरुष गेल्याने फाळके कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
Web Title :- Akola Crime News | a farmer died of electric shock in akola patur
हे देखील वाचा :
Pune Crime News | माल न पुरवता ९१ लाखांना लावला चुना; व्यावसायिकाला घातला गंडा
The post Akola Crime News | शेतात मोटार सुरू करताना विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू appeared first on बहुजननामा.