Header

Maharashtra Politics | उद्धव ठाकरेंची स्थिती ‘शोले’मधील आसराणींसारखी, अमित शहांना ‘मोगॅम्बो’ म्हणाऱ्या ठाकरेंना भाजपचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)

Maharashtra Politics | उद्धव ठाकरेंची स्थिती ‘शोले’मधील आसराणींसारखी, अमित शहांना ‘मोगॅम्बो’ म्हणाऱ्या ठाकरेंना भाजपचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Politics | मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमित शाह (Amit Shah) यांचा उल्लेख ‘मोगॅम्बो’ असा केला होता. मोगॅम्बोच्या अनेक पिढ्या उतरल्या तरीही शिवसेना (Shivsena) संपणार नाही, असे ठाकरे म्हणाले होते. (Maharashtra Politics) त्यांच्या टीकेला भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विधिमंडळाच्या परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

आशिष शेलार म्हणाले, उद्धव ठाकरेंची मनस्थिती, त्यांचा थयथयाट, तळतळाट, त्रागा, नैराश्य, वैफल्य यासर्व गोष्टी आम्ही समजू शकतो. राजकारण करताना आम्ही कधीच टीकेला घाबरत नाही. पण राजकारणाचे (Maharashtra Politics) काही संकेत असतात. त्याप्रमाणे टीका करताना संयम आणि मर्यादा पाळायची असते, असे शेलार म्हणाले.

 

 

आम्ही सहन करणार नाही

उद्धव ठाकरे यांना इशारा देताना आशिष शेलार म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आमचा अभिमान आणि
स्वाभिमान आहेत. त्यांच्यावर अशा प्रकरे खालच्या पातळीवर टीका केली तर आम्ही सहन करणार नाही.
अन्यथा आम्हालाही आमच्या मर्यादा सोडाव्या लागतील. मी कोकणी माणूस आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे.
आमच्याकडे त्यापेक्षा वाईट शब्द असल्याचे शेलार म्हणाले.

 

त्यांची परिस्थिती असराणी सारखी

उद्धव ठाकरे हिंदी चित्रपटातील असराणी सारखे झाले आहेत. शोले चित्रपटात (Sholay) जसे असराणी म्हणतात,
‘आधे इतर जावो, आधे उधर जावो’, तशी परिस्थीती त्यांची झाली आहे. याची सुरुवात तुम्ही केली.
मात्र शेवट आम्ही करु. आमित शहांवर अशा प्रकारची टीका आम्ही सहन करणार नाही, असेही शेलार यांनी सांगितले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Maharashtra Politics | bjp leader ashish shelar replied to uddhav thackeray for calling mogambo to amit shaha

 

हे देखील वाचा :

Akola Crime News | शेतात मोटार सुरू करताना विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

Priyanka Chopra | ‘सिटाडेल’ वेब सिरीजमधील प्रियंका चोप्राचा फर्स्ट लूक आउट; फर्स्ट लूक पाहून चाहत्यांनी केले भरभरून कौतुक

Maharashtra Budget Session 2023 | कांद्याच्या मुद्यावरुन सदनात घमासान ! उपमुख्यमंत्री आक्रमक, म्हणाले – ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर हवे आहे की…’ (व्हिडिओ)

 

The post Maharashtra Politics | उद्धव ठाकरेंची स्थिती ‘शोले’मधील आसराणींसारखी, अमित शहांना ‘मोगॅम्बो’ म्हणाऱ्या ठाकरेंना भाजपचे प्रत्युत्तर (व्हिडिओ) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article