Header

Famous Movie | अक्षय नागनाथ गवसाने दिग्दर्शित ‘फेमस’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज

Famous Movie | अक्षय नागनाथ गवसाने दिग्दर्शित ‘फेमस’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज

बहुजननामा ऑनलाईन – ‘फेमस’ या चित्रपटाचे (Famous Movie) नुकतेच पोस्टर प्रदर्शित झाले आहे. ‘फेमस’ हा नवा कोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक ॲक्शन आणि रोमँटिक चित्रपट आहे. नुकत्याच लाँच झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये असे पाहायला मिळतंय की, दोन प्रमुख अभिनेत्यांमध्ये एक नायिका उभी आहे. अर्थात पोस्टर पाहून असा अंदाज वर्तविण्यात येत आहे की या चित्रपटात नायिकेसाठीची मुख्य कलाकारांची धडपड दिसेल. मात्र ही पाठमोरी नायिका कोण आहे याचा प्रत्येकजण तर्कवितर्क लावतोय. चित्रपटातील मुख्य नायिकेची झलक पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे आणि ही उत्सुकता आणखी काही दिवस अशीच राहणार आहे. कारण चित्रपटातील (Famous Movie) मुख्य नायिका प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास अजून काही क्षणाचा विलंब आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

‘गवसाने प्रॉडक्शन हाऊस’ आणि ‘गायकवाड सन्स प्रॉडक्शन हाऊस’ प्रस्तुत तसेच ‘ए. जी प्रोडक्शन हाऊस’ यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय नागनाथ गवसाने यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाचे निर्माते मनोज गवळी, आशिष गुंजेकर, महेश संजय गायकवाड, अंकित बजाज, अक्षय नागनाथ गवसाने हे आहेत. या चित्रपटात अभिनेता महेश गायकवाड आणि स्वरूप सावंत हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात मेघा शिंदे, साक्षी जाधव, प्रदीप शिंदे, विवेक यादव या कलाकारांना पाहणं रंजक ठरणार आहे. या चित्रपटात बालकलाकार म्हणून शौर्य प्रदीप चाकणकर आणि श्रीतेज प्रसाद चाकणकर दिसणार आहेत.

 

चित्रपटाबाबत बोलताना चित्रपटाचे (Famous Movie) दिग्दर्शक आणि निर्माते अशी दुहेरी भूमिका पेलवणारे अक्षय नागनाथ गवसाने म्हणाले की, “चित्रपटसृष्टी आणि आमचं अगदी जवळचं नातं आहे.
कारण चित्रपटसृष्टीत आमचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे, त्यामुळे चित्रपट निर्मिती करताना कोणत्या अडचणी येतात,
चित्रपट कसा बनतो हे आम्ही अगदी जवळून पाहिलं होतं.
दरम्यान कॅटरिंगचे काम करताना पडद्यामागील तांत्रिक गोष्टी आवड म्हणून शिकत ही होतो.
त्यावेळी मनात मी एक निश्चय केला की, एक दिवस आपण ही चित्रपटाची निर्मिती करायची.
आणि अखेर आज तो दिवस आलाय, वडिलांना आणि घरच्यांना दिलेला शब्द आज पूर्ण होतोय,
हा चित्रपट निखळ मनोरंजन आणि अ‍ॅक्शन थ्रिलरने भरलेला आहे.
तुम्हा रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद फक्त पाठीशी ठेवा.” असे अक्षय नागनाथ गवसाने म्हणाले आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Famous Movie | action movie famous poster released

 

हे देखील वाचा :

Aroh Velankar | आरोह वेलणकरच्या ट्विटने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाला आज ‘बाळासाहेब…’

Kim Kardashian | किम कर्दाशियने एलियन्ससोबत केले फोटोशूट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Akshay Kumar | अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाच्या मेकअप आर्टिस्टवर बिबट्याने केला हल्ला; व्हिडिओ व्हायरल

 

The post Famous Movie | अक्षय नागनाथ गवसाने दिग्दर्शित ‘फेमस’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article