Pune Crime News | बलात्काराची केस मागे घेण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकाची कोर्टात धमकी
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | बलात्काराच्या गुन्ह्याची दाखल केलेली केस मागे घे, नाही तर तुला खल्लास करुन टाकीन अशी धमकी शिवाजीनगर न्यायालयातील (Shivajinagar Court, Pune) कॅटीनमध्ये सहायक पोलीस निरीक्षकाने दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी एका ५० वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चंद्रकांत भगवान माने (वय ५३, रा. मधुबन सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर) या सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. चंद्रकांत माने हा सध्या सोलापूर येथील केगांव प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहे. (Pune Crime News)
याबाबतची माहिती अशी, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. चंद्रकांत माने हा पुण्यात असताना त्याची फिर्यादी यांच्याशी ओळख झाली होती. त्यातून त्याने त्यांच्यावर बलात्कार (Rape) केला होता.
याबाबत फिर्यादी यांनी २०२० मध्ये समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दाखल केली होती.
तसेच सोलापूर शहर पोलीस दलातील (Solapur City Police) विजापूर नाका पोलीस ठाण्यात (Bijapur Naka Police Station) फिर्याद दिली होती.
त्याविरोधात चंद्रकांत माने याने उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे. चंद्रकांत माने याने १७ फेब्रुवारी रोजी फिर्यादी यांना फोन करुन शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातील कॅन्टिनमध्ये बोलावून घेतले.
त्या तेथे पोहचल्यावर त्याने बलात्काराची फिर्याद मागे घे, नाही तर तुला खल्लास करुन टाकीन,
माझी वरपर्यंत पोहोच आहे. तुझ्यामुळे हायकोर्टात केस पेंडिग पडली आहे, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली.
शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक साळवे तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime News | Assistant Police Inspector threatened in court to withdraw rape case
हे देखील वाचा :
Manjiri Oak | प्रसाद ओकला वाढदिवसानिमित्त पत्नीने दिले खास सरप्राईज; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
The post Pune Crime News | बलात्काराची केस मागे घेण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकाची कोर्टात धमकी appeared first on बहुजननामा.