Header

Mumbai Crime News | धक्कादायक ! पनवेलमध्ये लेकीसोबत बापानेच केले दुष्कर्म; मुलीच्या पोटात दुखू लागल्याने झाले उघड

Mumbai Crime News | धक्कादायक ! पनवेलमध्ये लेकीसोबत बापानेच केले दुष्कर्म; मुलीच्या पोटात दुखू लागल्याने झाले उघड

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  – Mumbai Crime News | उरणमध्ये एक 14 वर्षांच्या मुलाने शेजारी राहणाऱ्या 5 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असताना आता पनवेलमध्ये बाप – लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये सावत्र बापाने 14 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) केला आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा (FIR) दाखल करून दोघांना अटक (Arrest) केली आहे. (Mumbai Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
हि घटना पनवेलमधील विचुंबे भागामध्ये घडली आहे. यामध्ये एका सावत्र बापाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील पीडित मुलगी इयत्ता नववीत शिकत असून काही महिन्यांपूर्वी या पीडित मुलीवर तिच्या सावत्र बापाने लैंगिक अत्याचार केले होते. त्यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली होती. (Mumbai Crime News)

 

मागच्या आठवड्यात या पीडित मुलीला त्रास जाणवू लागल्यानंतर तिला आईने रुग्णालयात नेले.
यावेळी डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, ती गरोदर असल्याचे समोर आले. यानंतर खांदेश्वर पोलिसांनी पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली. यानंतर पीडित मुलीने आपल्यावर सावत्र बापाने लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. यानंतर पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून खांदेश्वर पोलिसांनी आरोपी सावत्र बापाला अटक केली आहे. त्याच्यावर बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Web Title :- Mumbai Crime News | two minor girls sexually assaulted in panvel and uran

 

हे देखील वाचा :

Shiv Sena | शिवसेना अन् धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मुख्यमंत्री म्हणाले-‘अखेर…’ (व्हिडिओ)

Lions Veterans Cup T-20 Cricket | लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ टी-२० क्रिकेट २०२३ स्पर्धा; लवास रॉयल्स् संघाला विजेतेपद

Shiv Sena | हा खोक्यांचा विजय, निकाल विकत घेतला; निवडणूक आयोगाच्या निकालावर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

 

The post Mumbai Crime News | धक्कादायक ! पनवेलमध्ये लेकीसोबत बापानेच केले दुष्कर्म; मुलीच्या पोटात दुखू लागल्याने झाले उघड appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article