Header

Shahnawaz Pradhan Passes Away | अभिनेते शाहनवाज प्रधान यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shahnawaz Pradhan Passes Away | अभिनेते शाहनवाज प्रधान यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बहुजननामा ऑनलाईन –   मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते शहानवाज प्रधान यांचे निधन (Shahnawaz Pradhan Passes Away) झाले आहे. बॉलीवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी आजवर काम केले आहे. वयाच्या 56 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी ‘मिर्झापूर’ वेब सिरीज मध्ये अभिनेता अली फजलच्या सासऱ्यांची भूमिका साकारली होती. (Shahnawaz Pradhan Passes Away)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मुंबईतील एका कार्यक्रमात शहानवाज प्रधान यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते बेशुद्ध होऊन खाली कोसळले. यावेळी तातडीने त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शहानवाज यांच्या निधनाची बातमी कळताच सिनेसृष्टीत एकच शोककळा पसरली आहे. तर अभिनेते राजेश तैलंग यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

राजेश यांनी शहानवाज (Shahnawaz Pradhan Passes Away) यांचा फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये म्हटले की, “शाहनवाद भाई अखेरचा सलाम तुम्ही इतक्या लवकर आमची साथ सोडाल असे वाटले नव्हते. तुम्ही उत्तम व्यक्ती आणि दमदार अभिनेते आहात. मिर्झापूरच्या शूटिंग दरम्यान तुमच्याबरोबर खूप चांगला वेळ व्यतीत केला आणि खूप गोष्टी शिकायला देखील मिळाल्या. तुम्ही आज या जगात नाही यावर अजूनही विश्वास बसत नाही”. राजेश तैलंग यांच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत शाहनवाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

 

शाहनवाज यांनी 1991 साली अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी मुंबईत दाखल झाले.
‘जनसे जनतंत्र तक’ या टीव्ही मालिकेतून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
यानंतर त्यांनी ‘श्रीकृष्ण’ या मालिकेत नंदबाबा यांची भूमिका साकारली.
तर अलिफ लैला या मालिकेत सिंदबाद द सेलरची भूमिका साकारली.
याशिवाय त्यांनी ‘ब्योमकेश बख्शी’, ‘तोता वेड्स मैना’, ‘बंधन सात जन्मों का’ आणि ‘सूट लाइफ ऑफ करण अँड कबीर’ या मालिकांमध्ये देखील आपल्या अभिनयाचे ठसे उमटवले आहेत.
एवढेच नाही तर शहानवाज यांनी ‘बैंगिस्तान’ शाहरुख खानचा ‘रईस’ एमएस धोनीचा बायोपिक आणि लोकप्रिय
वेब सिरीज मिर्झापूर मध्ये ही आजवर काम केले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Shahnawaz Pradhan Passes Away | mirzapur actor shahnawaz pradhan passes away because of heart attack

 

 

हे देखील वाचा :

IPL Schedule 2023 | IPLचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी पार पडणार पाहिला आणि अंतिम सामना ?

Pune Crime News | मालक – चालक यांच्या वादात हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना ठेवले कोंडून; लोणी स्टेशन येथील घटना

Mumbai Crime News | धक्कादायक ! पनवेलमध्ये लेकीसोबत बापानेच केले दुष्कर्म; मुलीच्या पोटात दुखू लागल्याने झाले उघड

 

The post Shahnawaz Pradhan Passes Away | अभिनेते शाहनवाज प्रधान यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article