Header

Nagpur ACB Trap | अदखलपात्र गुन्हा निकाली काढण्यासाठी लाचेची मागणी, महिला स्वच्छतागृहासमोर लाच घेताना लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Nagpur ACB Trap | अदखलपात्र गुन्हा निकाली काढण्यासाठी लाचेची मागणी, महिला स्वच्छतागृहासमोर लाच घेताना लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन  अदखलपात्र गुन्हा निकाली काढण्यासाठी तीन हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) नागपूर तहसील कार्यालयातील (Nagpur Tehsil Office) कनिष्ठ लिपिकाला नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nagpur ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. अमोल देशपांडे (Amol Deshpande) असे लाचखोर लिपिकाचे (Junior Clerk) नाव आहे. नागपूर एसीबीने (Nagpur ACB Trap) तहसील कार्यालयातील महिलांच्या स्वच्छतागृहासमोर सापळा रचून ही कारवाई केली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील तक्रारदाराच्या पालकांवर अदखलपात्र गुन्हा आहे. हे प्रकरण निकाली काढण्यासाठी तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या कनिष्ठ लिपिकाने तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदार यांनी नागपूर एसीबीकडे (Nagpur ACB Trap) याबाबत तक्रार केली.

 

काय आहे प्रकरण?
तक्रारदार आणि त्यांच्या आई-वडिलांचा शेजाऱ्या सोबत वाद झाला होता. याबाबत खापा पोलीस ठाण्यात (Khapa Police Station) अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार आणि त्यांच्या आई-वडिलांवर सावनेर तहसील कार्यालयात प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) होणार असल्याचे समन्स तक्रादार यांना मिळाले. हे प्रकरण निकाली काढण्यासाठी कनिष्ठ लिपिक अमोल देशपांडे यांनी साडेचार हजार रुपये लाच मागितली. तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले.

 

नागपूर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तीन हजार रुपये लाच घेताना तहसील कार्यालयातील महिलांच्या स्वच्छतागृहासमोर आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले.
आरोपीविरुद्ध सावनेर पोलीस ठाण्यात (Savner Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आले असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र, नागपूर, पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर (SP Rahul Maknikar),
अपर पोलीस अधीक्षक मधुकर गिते (Addl SP Madhukar Gite) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अनामिका मिर्झापुरे (DySP Anamika Mirzapure),
पोलीस निरीक्षक प्रवीण लाकडे (Police Inspector Pravin Lakde), पोलीस निरीक्षक प्रीति शेंडे (Police Inspector Preeti Shende),
पोलीस अंमलदार सारंग बालपांडे गीता चौधरी, करुणा सहारे, अस्मिता मेश्राम, आशू श्रीरामे, दीपाली भगत, अमोल भक्ते यांच्या पथकाने केली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title : – Nagpur ACB Trap | 3000 sought to settle non cognizable offence bribery junior clerk arrested in nagpur

 

हे देखील वाचा :

Dr. Narendra Dabholkar Murder Case | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची उलटतपासणी

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणूक : हेमंत रासनेंच्या मागे ‘सत्तेची ताकद’ तर रविंद्र धांगेकरांना जनतेचा ‘आशीर्वाद’?

 

The post Nagpur ACB Trap | अदखलपात्र गुन्हा निकाली काढण्यासाठी लाचेची मागणी, महिला स्वच्छतागृहासमोर लाच घेताना लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article