Header

Nagpur Crime News | मुलीला तिच्या बॉयफ्रेंड बरोबर नको त्या अवस्थेमध्ये पाहिल्यावर वडिलांनी उचलले ‘हे’ पाऊल

Nagpur Crime News | मुलीला तिच्या बॉयफ्रेंड बरोबर नको त्या अवस्थेमध्ये पाहिल्यावर वडिलांनी उचलले ‘हे’ पाऊल

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन  – Nagpur Crime News | नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये वडिलांनी आपल्या मुलीच्या प्रियकराला (Boyfriend) बेदम मारहाण (Beating) करत त्याच्यावर रॉडने हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जखमी प्रियकराने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक (Arrest) केली आहे. या प्रकरणातील जखमी प्रियकराचे नाव हरीश असे असून तो कळमेश्वर या ठिकाणचा रहिवाशी आहे. (Nagpur Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय आहे नेमके प्रकरण?
हरीश याचे त्याच्या गावात राहणाऱ्या एका तरुणीशी गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांच्या प्रेमप्रकरणाची संपूर्ण गावात चर्चा होती. ते एकमेकांना गावच्या उद्यानात भेटत असत. अनेकांनी या दोघांना एकत्र पाहिल्याने त्यांच्या नात्याची बाब मुलीच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचली. यानंतर मुलीच्या पालकांनी तिची समजूत काढून तिला हरीशबरोबर नाते तोडायला सांगितले. मात्र मुलगी काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती यामुळे तिच्या वडिलांनी तिला कित्येकवेळा मारहाणसुद्धा केली. (Nagpur Crime News)

 

यादरम्यान 16 फेब्रुवारी रोजी मुलीच्या घरचे सगळे शेतावर गेले होते.
त्यामुळे तिने आपला प्रियकर हरीशला घरी भेटण्यासाठी बोलावले. हरीश दुपारी एक वाजता तिच्या घरी आला.
त्यांच्यात तासभर चर्चा झाली. यादरम्यान अचानक मुलीचे वडील घरी आले व त्यांनी त्या दोघांना खोलीमध्ये नको त्या परिस्थितीत पाहिलं. यानंतर हरीशने घटनास्थवरून पळ काढला.
यानंतर मुलीच्या वडिलांना राग अनावर त्यांनी लगेच हरीशला फोन करून घरी बोलावून घेतले. यानंतर मुलीच्या वडिलांनी घरातून लोखंडी रॉड आणून त्याला मारहाण केली.
यानंतर हरीशने जखमी अवस्थेमध्ये पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या मैत्रणीच्या वडिलांनी आपल्यावर
हल्ला केल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी हरीशच्या तक्रारीवरून प्रेयसीच्या वडिलांवर गुन्हा दाखल
करून त्यांना अटक केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Nagpur Crime News | girl getting caught red handed with boyfriend by father

 

हे देखील वाचा :

Pune Kasba Peth Bypoll Election | भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांची भव्य पदयात्रा

Ashok Chavan | माझा घातपात घडवण्याचे कारस्थान, अशोक चव्हाणांची पोलिसांकडे तक्रार; राजकीय वर्तुळात खळबळ

Pune Water supply | अर्ध्या पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

 

The post Nagpur Crime News | मुलीला तिच्या बॉयफ्रेंड बरोबर नको त्या अवस्थेमध्ये पाहिल्यावर वडिलांनी उचलले ‘हे’ पाऊल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article