Header

Dadasaheb Phalke Award 2023 | दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; आलिया ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर रणबीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

Dadasaheb Phalke Award 2023 | दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; आलिया ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर रणबीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

बहुजननामा ऑनलाईन – यंदाचा सिनेसृष्टीतील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार-2023’ (Dadasaheb Phalke Award 2023) हा चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला आहे. हा पुरस्कार सोहळा मुंबईतील ताज लँड एंड या हॉटेलमध्ये पार पडला आहे. बॉलीवूडमधील आलीया आणि रणबीर या जोडीला हा पुरस्कार सोहळा खूपच महत्वाचा ठरला. कारण या जोडीला पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि अभिनेता या पुरस्काराने गौरवण्यात आलं. या पुरस्कार (Dadasaheb Phalke Award 2023) सोहळ्यात आलीया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमातील भूमिकेसाठी तसेच सिनेविश्वातील योगदानासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

तर दुसरीकडे आलियाचा पती आणि बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरला ‘ब्रह्मास्त्र’ या  सिनेमातील शिवा या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. आलिया भट्टने ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ (Dadasaheb Phalke Award 2023) सोहळ्यात हजेरी लावली होती. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर आलिया भट्टने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमीही दिली आहे. पुरस्कार सोहळ्यात आलियाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा सुपरहिट ठरला होता.

 

 

या सिनेमात तिने सेक्स वर्कर-माफिया डॉनची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. जगभरात तिची ही भूमिका प्रचंड गाजली. तर दुसरीकडे अर्यान मुखर्जी  दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात रणबीरने साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. त्यामुळेच त्याला या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. परंतु  रणबीर कपूर आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी मुंबईबाहेर असल्याने तो या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित नव्हता. त्यामुळे आलियाने रणबीरच्या वतीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार स्वीकारला. एकंदरीतच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची मुलगी राहा हि तिच्या आई वडिलांसाठी भाग्यवान  ठरली. दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्ट, रेखा, वरुण धवन, अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री, ऋषभ शेट्टी, रोनित रॉय, श्रेयस तळपदे, आर बाल्कीसह अनेक सेलिब्रिंटींनी हजेरी लावली होती.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title : Dadasaheb Phalke Award 2023 | Dadasaheb Phalke Award Announced; Alia won the Best Actress award while Ranbir won the Best Actor award

 

हे देखील वाचा :

Onkar Bhojane | हास्य जत्रा फेम ओंकार भोजनेचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

IND vs AUS | ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का ! ‘हे’ दोन मॅच विनर खेळाडू टीममधून बाहेर

MPSC Students Protest in Pune | आवश्यकता पडल्यास कोर्टात जाऊ, देवेंद्र फडणवीसांचे MPSC विद्यार्थ्यांना आश्वासन

 

The post Dadasaheb Phalke Award 2023 | दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; आलिया ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर रणबीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article