Header

Nanded Crime News | पार्टी करताना वाद झाल्याने आरोपीकडून मित्रावर प्राणघातक हल्ला; नांदेडमधील घटना

Nanded Crime News | पार्टी करताना वाद झाल्याने आरोपीकडून मित्रावर प्राणघातक हल्ला; नांदेडमधील घटना

नांदेड : बहुजननामा ऑनलाईन  Nanded Crime News | नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मित्रानेच एका छोट्याशा भांडणातून आपल्या जवळच्या मित्रावर प्राणघातक हल्ला केला आहे. नांदेड शहराच्या विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुरी चौक माळटेकडी परिसरात हि घटना घडली आहे. खाण्यापिण्याच्या वादावरून आरोपीने आपल्याकडे असणाऱ्या गावठी कट्ट्यातून मित्रावर फायरिंग केली आहे. यामध्ये जखमी झालेल्या मित्रावर नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. हि घटना काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. (Nanded Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
शेख इरफान शेख गुड्डू (वय 25, रा. मगदूमनगर, न‌ई आबादी नांदेड) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. नांदेड शहराच्या माळटेकडी परिसरातील नुरी चौक भागात शेख इरफान शेख गुड्डू व त्याचा मित्र हे दोघे पार्टी करत बसले होते. थोड्यावेळात खाण्यापिण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी आरोपी मित्राने शेख इरफान शेख गुड्डू याच्यावर आपल्याजवळ असलेल्या गावठी कट्ट्यातून फायरिंग (Firing) केली. यामध्ये शेख इरफान याच्या पोटाला गोळी लागली आणि तो जखमी झाला. (Nanded Crime News)

 

या घटनेची माहिती मिळताच विमानतळाचे पोलीस अधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी
दाखल झाले. जखमी शेख इरफान याला विष्णुपुरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
या प्रकरणी आरोपीविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमानतळ पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
शहराच्या इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन फायरिंगच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा नांदेड शहरामध्ये
विमान ठाण्याच्या हद्दीत फायरिंगची घटना घडल्याने नांदेड जिल्हा हादरला आहे.
या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

Web Title :- Nanded Crime News | a friend firing a friend at an ongoing party in nanded

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | सह्याद्री इस्टेट पॉलीसीत गुंतविलेले पैसे परत मागितल्याने मारहाण करुन करुन केला विनयभंग; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Chinchwad Bypoll Election | चिंचवड पोटनिवडणूक : राहुल कलाटेंनी माघार घ्यावी, भविष्यात महाविकास आघाडीकडून…; उद्धव ठाकरेंचा कलाटेंना निरोप

 

The post Nanded Crime News | पार्टी करताना वाद झाल्याने आरोपीकडून मित्रावर प्राणघातक हल्ला; नांदेडमधील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article