Header

Pune Crime News | बोपदेव घाटात जोडप्याला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांकडून अटक; 2 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघड

Pune Crime News | बोपदेव घाटात जोडप्याला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांकडून अटक; 2 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघड

पुणे :  बहुजननामा ऑनलाईन Pune Crime News | बोपदेव घाटात (Bopdev Ghat) फिरण्यासाठी गेलेल्या जोडप्याला अडवून पुरुषाच्या गळ्यातील एक तोळे वजनाची सोन्याची चैन (Gold Chain) जबरदस्तीने चोरुन नेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. ही घटना (Pune Crime News) 12 फेब्रुवारी रोजी बोपदेव घाटातील टबेल पॉईन्ट येथे दुपारी घडला होता. याप्रकरणी आरोपीवर कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून दोन चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

शाहरुख उर्फ सुस्ताड शकिल अन्सारी-मन्सुरी (वय-20 रा. सय्यदनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना बोपदेव घाट ते सय्यदनगर दरम्यान बसवण्यात आलेले सीसीटीव्ही पोलीस अंमलदार सुहास मोरे, राहूल थोरात यांनी तपासले. त्यावेळी हा गुन्हा शाहरुख उर्फ सुस्ताड अन्सारी याने केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचा मोहम्मदवाडी परिसरात शोध घेत असताना आरोपी दुचाकीवरुन मित्रासोबत जाताना दिसला. (Pune Crime News)

 

पोलिसांनी गाडीचा पाठलाग करुन आरोपी आणि त्याचा अल्पवयीन मित्राला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपी शाहरुख याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडे करण्यात आलेल्या सखोल चौकशीत त्याने डिसेंबर महिन्यात गोकुळ हॉटेल जवळ पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र त्याचा साथीदार नुर याच्या मदतीने चोरल्याची कबुली दिली. दोन्ही गुन्ह्यात आरोपीने वापरलेली दुचाकी आणि लपवून ठेवलेली सोन्याची चैन व मंगळसुत्राचे पेंन्डड जप्त केले आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात (Wanavadi Police Station) वाहन चोरीचे तीन, मारहाणीचा एक गुन्हा (FIR) दाखल आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे (API Anil Suravse) करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख (Vikrant Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे (ACP Pournima Taware),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Senior Police Inspector Santosh Sonawane), पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (Police Inspector Crime Sanjay Mogle)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल सुरवसे (PSI Anil Survase),
पोलीस अंमलदार अमोल हिरवे, महेश वाघमारे, सुहास मोरे, गणेश चिंचकर, विकास मरगळे,
अभिजीत रत्नपारखी, राहुल रासगे, जयदेव भोसले, राहुल थोरात यांच्या पथकाने केली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime News | Kondhwa police arrests innkeeper who robbed couple in Bopadeo Ghat; 2 Chain Snatching Crimes Revealed

 

हे देखील वाचा :

Pune Kasba Peth Bypoll Election | आनंद दवेंकडून केवळ आणि केवळ भाजप उमेदवाराच्या विरोधात प्रचार होतोय; हिंदू महासंघ आणि ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकार्‍यांचा आरोप, यापुढे दवे यांचा प्रचार न करण्याची भूमिका (Video)

IPL 2023 | CSK च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ खेळाडूचे टीममध्ये झाले पुनरागमन

 

The post Pune Crime News | बोपदेव घाटात जोडप्याला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांकडून अटक; 2 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघड appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article