Header

Nagraj Manjule | नागराज मंजुळेंची मोठी घोषणा! पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर बनवणार चित्रपट

Nagraj Manjule | नागराज मंजुळेंची मोठी घोषणा! पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर बनवणार चित्रपट

बहुजननामा ऑनलाईन टीम : दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी पैलवान राहिलेल्या खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी ही घोषणा कोल्हापुरातील कुस्तीच्या मैदानातून केली आहे. आता चाहत्यांना त्याचबरोबर कुस्तीप्रेमींना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते. त्यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा निर्णय नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी घेतला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

महाशिवरात्री यात्रेनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उमळवाड मध्ये भव्य निकाली कुस्तींच्या जंगी मैदानात नागराज मंजुळे यांनी हजेरी लावली होती. याचवेळी त्यांनी कुस्तीच्या मैदानातून खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. याआधी आमिर खानचा दंगल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातून गीता आणि बबीता फोगाट यांच्या कुस्तीचा प्रवास दाखवण्यात आला होता. आता संपूर्ण जगाला खाशाबा जाधव यांच्या कुस्ती विषयी जाणून घेण्याची गरज असल्याचे मत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.

 

या चित्रपटाबाबत बोलताना नागराज मंजुळे (Nagraj Manjule) म्हणाले, “खाशाबा जाधव हे जागतिक कीर्तीचे आणि दर्जेदार पैलवान होते.
त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा नेहमीच मनात होती.
आता त्यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. माझ्यासाठी ही खूपच आनंदाची गोष्ट आहे.
लवकरच या संदर्भातील संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे.
या सिनेमाचा शूटिंग ही कोल्हापुरात होण्याची शक्यता आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना तो काळ अनुभवायला मिळणार हे मात्र नक्की”.

 

नागराज मंजुळे यांच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास येत्या 7 एप्रिलला त्यांचा ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
तर हा चित्रपट मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Nagraj Manjule | nagraj manjule upcoming movie announced on 1952 olympic winner wrestler khashaba jadhav

 

हे देखील वाचा :

Harbhajan Singh | हरभजन सिंगने केली के एल राहुलची पाठराखण; म्हणाला ‘त्याने कोणताही गुन्हा केला नाही’

Subi Suresh Passes Away | मल्याळम अभिनेत्री सुबी सुरेश यांचे निधन; वयाच्या 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

The post Nagraj Manjule | नागराज मंजुळेंची मोठी घोषणा! पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर बनवणार चित्रपट appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article