Header

Pune Crime News | अभ्यास करताना मोबाईल पाहतो, म्हणून रागविल्याने १२ वीतील मुलाने आईचा गळा दाबून केला खून, पुण्यातील घटना

Pune Crime News | अभ्यास करताना मोबाईल पाहतो, म्हणून रागविल्याने १२ वीतील मुलाने आईचा गळा दाबून केला खून, पुण्यातील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Pune Crime News | अभ्यास करताना मोबाईल पहात असलेल्या मुलाला रागविल्याने १२ वीत शिकणार्‍या मुलाने आईला भिंतीवर ढकलून देऊन गळा दाबून तिचा खून (Murder In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

तस्लीम जमीर शेख (वय ३७, रा. उरुळीकांचन) असे मृत्यु पावलेल्या महिलेचे नाव असून लोणी काळभोर पोलिसांनी (Pune Police) जिशन जमीर शेख (वय १८) याला अटक (Arrest) केली आहे.

 

याबाबत पोलीस उपनिरीक्षक अमोल लक्ष्मणराव घोडके यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४४/२३) दिली आहे. ही घटना उरुळी कांचन (Uruli Kanchan News) येथील माऊली कृपा इमारतीत १५ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्लीम शेख हिने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) पाठविला. डॉक्टरांना संशय आल्याने तेथे तीन डॉक्टरांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन करण्यात आले. त्यात गळा दाबून व डोक्याला जखम झाल्याने मृत्यु झाल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा नेमकी कोणी माहिती देण्यास तयार नव्हते. ही घटना घडली, तेव्हा वडिल जमीर आणि मुलगा जिशान हे दोघेच तेथे होते. त्यांच्याकडे स्वतंत्र चौकशी केल्यावर मुलाने घडलेली घटना सांगितली.

 

जमीर शेख हे नमाज पठणासाठी गेले होते. त्यांची धाकटी मुलगी बाहेर गेली होती.
मुलगा जिशान हा बारावीला आहे. तो अभ्यास करीत असताना मोबाईलवर पहात बसला होता.
ते पाहून त्याची आई तस्लीम चिडली व ती जिशानला रागविली. त्याच्या गालावर चापट मारली.
त्यामुळे जिशान याने आपल्या आईला जोरात भिंतीवर ढकलले व तिचा गळा दाबला. त्यात तिचा मृत्यु झाला.
आई निपचित पडल्याचे पाहून जिशान घाबरला. त्याने ब्लेडने तिचे मनगट कापले.
परंतु, मृत्यु झाला असल्याने त्यातून रक्त आले नाही. त्याने वायर फॅनला अडकविली. खाली आईचा मृतदेह ठेवला.
काही वेळाने जमीर शेख आल्यावर आईने गळफास घेतला. मी तिला खाली उतरुन ठेवल्याचे सांगितले.
त्यांनी तस्लीम यांना जवळच्या रुग्णालयात नेले.
तेथील डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी ससून रुग्णालयात नेण्यास सांगितले.
शवविच्छेदनात खूनाचा प्रकार समोर आला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत घरातील कोणीही फिर्याद देण्यास तयार नसल्याने पोलिसांच्या वतीने फिर्याद देण्यात आली असून
मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक काळे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | 12th grade boy strangled his mother to death due to anger while looking at mobile phone, incident in Pune

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Chinchwad Crime | रायडिंग अ‍ॅपद्वारे बुक केलेल्या गाडीतून ‘आयटी’तील महिलेचे अपहरण, नागरिकांच्या सतर्कतेमुळे महिलेची सुटका; हिंजवडी परिसरातील घटना

Pune Crime News | कसबा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वाहनात सापडली लाखोंची रक्कम, स्वारगेट परिसरातील घटना

Pune Pimpri Chinchwad Crime | टेलिग्रामद्वारे मेसेज करुन इंजिनीयर महिलेची 20 लाखांची फसवणूक, हिंजवडी परिसरातील घटना

 

The post Pune Crime News | अभ्यास करताना मोबाईल पाहतो, म्हणून रागविल्याने १२ वीतील मुलाने आईचा गळा दाबून केला खून, पुण्यातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article