Header

Urfi Javed | ‘उर्फी जावेदला दफनभूमीत….’; तिच्याविरोधात फतवा जारी

Urfi Javed | ‘उर्फी जावेदला दफनभूमीत….’; तिच्याविरोधात फतवा जारी

बहुजननामा ऑनलाईन टीम – उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर रोज काही ना काही अतरंगी फोटो शेअर करताना दिसत आहे. उर्फी जावेद नेहमी अतरंगी कपडे घालून मुंबईच्या रस्त्यावर फिरत असते. काही दिवसांपूर्वी उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात ट्विटरवर ट्विटयुद्ध सुरु झालं होतं. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याशी झालेल्या वादानंतर तर तिचं फोटो पोस्ट करण्याचं प्रमाण जरा जास्तच वाढलं आहे. उर्फीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. उर्फी जावेद (Urfi Javed) सध्या ट्वीटरवर सक्रिय पहायला मिळते. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तर तिने लाल रंगाच्या टू पीस बिकीनीतील तिचा खूपच हॉट फोटो शेअर केला होता. लाल रंगाच्या टू पीस बिकीनीत उर्फीनं शेअर केलेला तो फोटो खूपच व्हायरल होत आहे.

 

उर्फी जावेद आपल्या चित्र-विचित्र फॅशनसाठी ओळखले जाते. आणि याच गोष्टीमुळे सोशल मीडियासह सर्व ठिकाणी उर्फी कायम चर्चेचा विषय ठरते आणि अजून वेगवेगळ्या फॅशन घेऊन येत असते. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी याने उर्फी जावेद विरोधात फतवा काढला आहे. जेव्हा उर्फीचं निधन होईल तेव्हा तिला दफनभूमीत जागा दिली जाणार नाही असं या फतव्यामध्ये सांगण्यात आलं आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

फैजान अन्सारीने उर्फी जावेदसंबंधी दफनभूमीत अर्ज दिला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने सांगितलं आहे
की “उर्फी जावेदच्या (Urfi Javed) विरोधात फतवा जारी करण्यात आला आहे.
ज्या प्रकारचे कपडे उर्फी जावेद घालते त्याच्यामुळे जगभरातील मुस्लिमांची बदनामी होत आहे.
जर उर्फी जावेद इस्लामला मानत नाही असं तिचं म्हणणं असेल तर तिने आधी स्वतःच नाव बदलावं.
पण उर्फीने मुस्लिम धर्माच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत “.
त्यांचं म्हणणं आहे की, जेव्हा कधी मुस्लिम तरुणी नग्न फिरते तेव्हा लाज वाटते. उर्फीने इस्लामचा अपमान केला आहे.
जेव्हा तिचं निधन होईल तेव्हा तिला दफनभूमीत जागा देणार नाही”.

 

Web Title : – Urfi Javed | faizan ansari issued fatwa against urfi javed over her nudity clothes says will deny land in kabristan

 

हे देखील वाचा :

Police Inspector Transfer | नाशिक परिक्षेत्रामधील 7 पोलिस निरीक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या

Pune Pimpri Chinchwad Crime | रिलेशन ठेवले नाही तर तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची महिलेला धमकी, चिखली परिसरातील प्रकार

Chhagan Bhujbal | उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर…, छगन भुजबळांचे मोठे विधान (व्हिडिओ)

 

The post Urfi Javed | ‘उर्फी जावेदला दफनभूमीत….’; तिच्याविरोधात फतवा जारी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article