Pune Crime News | विवाहितेला चुलीतील लाकडाने चटके देऊन मिरची पावडरची पेस्ट बनवून टाकली तोंडात, कानात, डोळ्यात; कोथरुडमधील धक्कादायक प्रकार, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | माहेरहून हुंड्याचे पैसे घेऊन येण्यासाठी विवाहितेचा क्रूर छळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाहितेला चुलीतील पेटलेले लाकुड घेऊन चटके दिले. हातपाय बांधून मिरची पावडरची पेस्ट तयार करुन ते पाणी विवाहितेच्या तोंडात, काना, डोळ्यात टाकले. (Pune Crime News)
याप्रकरणी एका २२ वर्षाच्या विवाहितेने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६०/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिासंनी नागेश कार्तिक साहेबन्ने (वय २३), रत्ना कार्तिक साहेबन्ने (वय ४२), महादेवी जाधव (वय ५८) आणि लिंबराज भिसे (वय ५८, रा. केळेवाडी) यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार व हुंडा बंदी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार केळेवाडीतील गिरीजा सोसायटी व फिर्यादीच्या राहत्या घरी सुतारदरा येथे ऑक्टोबर २०२१ पासून २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत घडला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि नागेश साहेबन्ने यांचा ऑक्टोबर २०२१ मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर माहेरहून हुंड्याचे पैसे घेऊन ये, या कारणावरुन तिला शिवीगाळ करुन मारहाण करुन छळ केला जात होता. चुलीतील पेटलेले लाकुड घेऊन फिर्यादीच्या हातावर, पायावर, डोळ्याजवळ, ओठावर अनेकदा चटके दिले. फिर्यादीचे हातपाय बांधुन मिरची पावडरमध्ये पाणी मिसळून याची पेस्ट बनवून ती फिर्यादीच्या तोंडात, कानात, डोळ्यात टाकली. त्यात फिर्यादी यांना जबर दुखापत झाली. पोलीस उपनिरीक्षक कोकाटे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | The married woman was beaten with wood from the
stove and made a paste of chilli powder and put it in the mouth, ears and eyes
हे देखील वाचा :
Pune Crime News | न्यायाधीन वयोवृद्ध बंद्यांना आता स्वखर्चाने जाड अंथरूण आणण्याची अनुमती
The post Pune Crime News | विवाहितेला चुलीतील लाकडाने चटके देऊन मिरची पावडरची पेस्ट बनवून टाकली तोंडात, कानात, डोळ्यात; कोथरुडमधील धक्कादायक प्रकार, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल appeared first on बहुजननामा.