Header

NCP Chief Sharad Pawar | ‘पहाटेच्या शपथविधीमुळे एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे…’ शरद पवारांचं मोठं विधान (व्हिडिओ)

NCP Chief Sharad Pawar | ‘पहाटेच्या शपथविधीमुळे एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे…’ शरद पवारांचं मोठं विधान (व्हिडिओ)

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना माहिती होतं असा खळबळजनक दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवार (Ajit Pawar) यांनी मौन बाळगले असताना आता शरद पवार (Sharad Pawar) यांनीच मोठं विधान केलं आहे. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राज्यातील राष्ट्रपती राजवट (President’s Rule) उठली नसती, असं मोठं विधान शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केलं आहे. ते बुधवारी (दि.22) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पवारांनी केलेल्या विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, सरकार बनवण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की राष्ट्रपती राजवट होती ती उठली. ती उठल्यानंतर काय घडलं ते तुम्हा सर्वांनाच माहित आहे. राज्यात तेव्हा तसं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्याचे मुख्यमंत्री झाले असते का? असं शरद पवार म्हणाले.

 

 

काहीही झालं की एका व्यक्तीचं नाव येतं
शरद पवार यांनी केलेल्या विधानावर हे घडलं त्याला तुमचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता का? असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर पवार म्हणाले, महाराष्ट्रात काहीही झालं की एका व्यक्तीचं नाव येतं हे आपल्या राज्याचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल,
असं मिश्किल उत्तर दिलं. लातूरला भूकंप झाला त्याला कारणीभूत देखील मीच होतो असंही बोललं जातं,
असंही शरद पवार यांनी यावेळी म्हणाले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | sharad pawar big statement president rule was lifted only because of morning swearing in

 

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Decision | गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Osmanabad Crime News | आर्थिक देवाण घेवाणीवरुन शिक्षकाने आपल्या जिवलग मित्रालाच संपवले; उस्मानाबादमधील घटना

Pune Crime News | नोकरीचे आमिष दाखवून ८ जणांची ११ लाखांची फसवणुक; बीपीओ चालकाला अटक

Solapur Crime News | धक्कादायक! सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांची आत्महत्या

 

The post NCP Chief Sharad Pawar | ‘पहाटेच्या शपथविधीमुळे एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे…’ शरद पवारांचं मोठं विधान (व्हिडिओ) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article